अमरावतीचा विमानतळ अखेर एमएडीसीकडें
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:41 AM2018-01-04T04:41:07+5:302018-01-04T04:41:44+5:30
अमरावती येथील बेलोरा विमानतळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्यामुळे या विमानतळाच्या विकासाला गती मिळणार आहे.
मुंबई : अमरावती येथील बेलोरा विमानतळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्यामुळे या विमानतळाच्या विकासाला गती मिळणार आहे.
या विमानतळाच्या विकासासाठी चालू आर्थिक वर्षात १५ कोटी तर पुढील आर्थिक वर्षासाठी ६० कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच घेतला आहे. त्याबाबतचा जीआर आज काढण्यात आला.
नाशिक, नांदेडमधून विमानसेवा सुरू केल्यानंतर आता अमरावतीतून विमानसेवा सुरू करण्यास एमएडीसीचे प्राधान्य असेल. चंद्रपूर आणि अकोलामधून विमानसेवा सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे विमानतळ दुसºया टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे.