Video: अमृता फडणवीसांनी बाबा रामदेवांच्या सन्नदिशी कानाखाली ओढली पाहिजे होती - रुपाली पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 05:08 PM2022-11-25T17:08:31+5:302022-11-25T17:14:59+5:30
बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या मोफत योग शिबिरात महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले
पुणे : पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव हे नेहमी आपल्या वक्तव्यांनी देशभरात चर्चेत असतात. यावेळी पतंजलीच्या मोफत योग शिबिरात महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें मंचावर उपस्थित होते. 'महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात. असं ते शिबिरात म्हणाले आहेत. रामदेव बाबांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी या वक्तव्याबाबत रामदेव बाबांवर हल्लाबोल केला आहे. बाबा, शीर्षासन करा म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा नीट होईल..." असं त्या म्हणाल्या आहेत.
तर तेव्हाच अमृता फडणवीसांनी बाबा रामदेवांच्या सन्नदिशी कानाखाली ओढली पाहिजे होती. असा हल्लाबोल पाटील यांनी यावेळी केला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, महिलांनी काय घालायाच काय नाही त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. अमृता फडणवीसांनी तेव्हाच बाबा रामदेव यांच्या कानाखाली मारायला हवी होती. महिलांनी साडी, सलवार घालणे ईथपर्यंत ठीक होतं पण पुढचं विधान कितपत योग्य याचा विचार करायला हवा. रामदेव बाबा डोकं खाली पाय वर करा म्हणजे तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही. रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळ फासणार आहोत. गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.