निगडाळे शाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:51+5:302021-08-18T04:13:51+5:30
सह्याद्री पर्वतरांगेत कोसळणाऱ्या श्रावणधारा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक अशोक शेवाळे यांच्या हस्ते ध्वजपूजन ...
सह्याद्री पर्वतरांगेत कोसळणाऱ्या श्रावणधारा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक अशोक शेवाळे यांच्या हस्ते ध्वजपूजन व सामाजिक कार्यकर्ते शांताराम लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी वन समिती सदस्य जितेंद्र गायकवाड, युवा नेते विनायक लोहकरे, संतोष लोहकरे, दत्तात्रय लोहकरे, शामराव तिटकारे, अंकुश लोहकरे, शिपाई बुधाजी असवले उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन शासन निर्णयाचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजपूजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव लोहकरे व ध्वजारोहण पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सामूहिक राष्ट्रगीत व ध्वजगीत गायनाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक संतोष थोरात, शिक्षिका अलका गुंजाळ, अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे, मदतनीस लीलाबाई लोहकरे, कामगार संस्था अध्यक्ष नीलेश लोहकरे, ज्ञानेश्वर लोहकरे, उमेश लोहकरे, तुषार लोहकरे, राजू कोकाटे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी माजी सरपंच दीपक चिमटे, नामदेव गायकवाड, सुरेश तिटकारे, मारुती तळपे, नामदेव कोंढवळे, वनमजूर भीमाशंकर अभयारण्य, सम्यक बुध विहार ट्रस्ट व साईनाथ तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर शासन निर्णयाचे पालन करत शालेय विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, राष्ट्रगीत गायन, चित्रकला आदी स्पर्धांत सहभाग घेतला. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
निगडाळे (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित मान्यवर.