ढोल-ताशा पथकाच्या सरावावरून घरी येण्यास उशीर झाल्याने ११ वर्षीय मुलाला मारहाण

By नितीश गोवंडे | Published: August 31, 2023 06:45 PM2023-08-31T18:45:43+5:302023-08-31T18:50:43+5:30

याप्रकरणी पोलिस शिपाई विठ्ठल घुले यांच्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी आत्या व आजीवर बाल संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे...

An 11-year-old boy was beaten up for coming home late from the dhol-tasha troupe practice | ढोल-ताशा पथकाच्या सरावावरून घरी येण्यास उशीर झाल्याने ११ वर्षीय मुलाला मारहाण

ढोल-ताशा पथकाच्या सरावावरून घरी येण्यास उशीर झाल्याने ११ वर्षीय मुलाला मारहाण

googlenewsNext

पुणे : ढोल-ताशा पथकाच्या सरावावरुन घरी येण्यास उशीर झाल्याने ११ वर्षीय मुलाला त्याच्या आत्या आणि आजीने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई विठ्ठल घुले यांच्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी आत्या व आजीवर बाल संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले आणि त्यांचे सहकारी येरवडा येथील प्रकाशनगरमध्ये गस्त घालत असताना, दोन जण त्यांच्याजवळ आहे. त्यांनी दोन महिला एका लहान मुलाला बेदम मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेच्या घरी जात विचारपूस केली. तेव्हा दोन्ही महिलांनी जोरजोरात ओरडत शिवीगाळ करून आमची तक्रार कोणी केली, त्याचे नाव सांगा अशी विचारणा केली. त्यावेळी घरातील एका ड्रमजवळ एक मुलगा रडत होता. पोलिसांनी त्याला विचारल्यावर या ११ वर्षीय मुलाने सांगितले की, तो ढोल-ताशा पथकात जातो. त्यामुळे घरी यायला उशीर झाला म्हणून, त्याच्या आत्या आणि आजीने पाईपने मारहाण केली, आणि अशी मारहाण या दोघी नेहमी करत असल्याचेही त्याने सांगितले. तसेच मला या उपाशी ठेवतात, माझी आई सोबत राहत नाही, ती गेवराईला राहते. पण वडील आईकडे जाऊ देत नाहीत, अशी तक्रार देखील मुलाने पोलिसांकडे केली.

यावेळी त्याच्या हातावर पाईपने मारलेले व्रण दिसून आले. यानंतर पोलिसांनी त्या मुलावर ससून रुग्णालयात उपचार केले, त्यानंतर आत्या आणि आजीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शेलार करत आहेत.

Web Title: An 11-year-old boy was beaten up for coming home late from the dhol-tasha troupe practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.