जिगरबाज मोटरमनमुळे पुण्यात १० वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 09:08 AM2022-09-12T09:08:06+5:302022-09-12T09:09:50+5:30

पाण्याची बाटली आणायला म्हणून गेली......

An attempt to kidnap a 10-year-old girl in Pune was foiled by a daring motorman | जिगरबाज मोटरमनमुळे पुण्यात १० वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

जिगरबाज मोटरमनमुळे पुण्यात १० वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

Next

- कल्याणराव आवताडे

पुणे : एका दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रकार एका लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणेरेल्वे स्थानकावरील लोको शेडजवळ घडली. खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी भागात राहणारे मोहम्मद रफीक अमीर सुलेमानी (वय ५५) असे या जिगरबाज मोटरमनचे नाव आहे.

शनिवारी रात्री लोणावळ्यावरून पुणे स्टेशनकडे लोकल चालवित असताना त्यांना पुणे स्टेशनजवळ एका चिमुकलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. सतर्क असलेल्या मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल थांबवली. तेव्हा एक जण अंधारात या चिमुकल्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलून पळवून नेत असल्याचे दिसले. यावेळी मोहम्मद रफीक सुलेमानी यांनी आरडा-ओरडा केल्याने आरोपी त्या मुलीला तेथेच टाकून पळून गेला. यावेळी प्रवाशांच्या मदतीने मुलीची सुटका केली. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला.

दरम्यान, वडीलकीच्या नात्याने त्या मुलीची चौकशी केली असता ती आईसोबत महालक्ष्मी एक्स्प्रेसने किर्लोस्करवाडी येथे निघाली असल्याचे समजले. सर्वांनी तत्काळ प्लॅटफॉर्म नंबर एकवर धाव घेतली. त्यानंतर आईचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात मुलीला दिले. आईला पाहताच या मुलीने हंबरडा फोडला. स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासले असता, संबंधित आरोपी त्या मुलीला जबरदस्तीने घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तक्रार नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळते आहे.

पाण्याची बाटली आणायला म्हणून गेली...

दहा वर्षांची चिमुकली आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर बसली होती. यावेळी आईने तिला पाण्याची बाटली आणायला पाठविले. दरम्यान, आरोपी हा त्यांच्या शेजारीच बसला होता. ती मुलगी पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता त्याने तिला येथे पाणी खराब मिळते, पुढे चांगले पाणी आहे, असे सांगितले व पुढे गेल्यावर जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

पुणे रेल्वे स्थानकाजवळ येत असताना मला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. नीट पाहिले तर एक माणूस एका लहान मुलीला जबरदस्तीने अंधारात घेऊन जात असल्याचे लक्षात आले. अल्लाहने माझ्याकडून हे पुण्य कर्म करून घेतले. अन्यथा त्या मुलीसोबत काहीही घडू शकले असते.

- मोहम्मद रफीक सुलेमानी, मोटरमन

Web Title: An attempt to kidnap a 10-year-old girl in Pune was foiled by a daring motorman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.