पुण्यात रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:13 PM2022-11-17T17:13:09+5:302022-11-17T17:14:09+5:30

दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल...

An attempt was made to beat up a policeman on night patrol in Pune | पुण्यात रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुण्यात रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Next

लोणी काळभोर (पुणे ) :  ”आरडाओरड करू नका तुमच्या घरी जा" असे म्हणाल्याचा राग मनात धरून रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना शिवागीळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १६ ) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याजवळ (कदमवाकवस्ती) घडली. याप्रकरणी विवेक किशोर साळुंखे (वय २६ वर्षे रा.साळुंखे वस्ती मांजरी खुर्द, पुणे) व मयुर बबन आंबेकर (वय २८ वर्षे ) या दोघांविरुद्ध लोणी काळभोरपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार घनश्याम आडके व संदीप धुमाळ हे बुधवारी (दि.१६) रात्री कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोलनाक्याजवळ पेट्रोलिंग करीत असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जनता हॉटेलसमोर दोन युवक मोटारसायकलवर मोठमोठ्याने आरडाओरड करीत बाचाबाची करीत होते. त्यावेळी बिट मार्शल पोलीस अंमलदार संदीप धुमाळ यांनी त्या दोघांना आरडा ओरड करू नका तुमच्या घरी जा, असे बोलल्यावर त्या दोघांनी धुमाळ यांना शिवागीळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने हाताने व डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले.

यामध्ये पोलीस अंमलदार धुमाळ हे जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान दोन्ही युवकांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.

Web Title: An attempt was made to beat up a policeman on night patrol in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.