निर्दयी! पत्नीसोबतच्या भांडणात ८ वर्षांची मुलगी आली; नशेत पित्याने तिच्यावरच गोळी झाडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:23 PM2022-09-24T12:23:03+5:302022-09-24T19:10:53+5:30

मुलीचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड......

An eight-year-old girl was shot in a fight between husband and wife | निर्दयी! पत्नीसोबतच्या भांडणात ८ वर्षांची मुलगी आली; नशेत पित्याने तिच्यावरच गोळी झाडली

निर्दयी! पत्नीसोबतच्या भांडणात ८ वर्षांची मुलगी आली; नशेत पित्याने तिच्यावरच गोळी झाडली

Next

धायरी (पुणे) : नवरा - बायकोच्या भांडणात स्वतःच्या आठ वर्षीय मुलीला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पांडुरंग तुकाराम उभे (वय :३८ वर्षे, रा. हेरंब हाईट्स, नऱ्हे, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे हे कुटुंबासह नऱ्हे येथील जेएसपीएम कॉलेज जवळ असणाऱ्या परिसरात राहतात. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे परवाना असलेले रिवाल्वर आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते दारू पिऊन घरी आले. त्यामुळे दोघा नवरा - बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्यांनी बायकोवर रिवाल्वर उगारली मात्र ती गोळी त्यांच्या आठ वर्षीय मुलीला छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. 

मुलीचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांची धडपड...
गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पांडुरंग उभे यांना ताब्यात घेतले. तसेच ज्या खासगी रुग्णालयात जखमी राजनंदिनीवर उपचार चालू आहेत. त्या ठिकाणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी जाऊन जखमी राजनंदिनी चौकशी केली. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले.

Web Title: An eight-year-old girl was shot in a fight between husband and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.