अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा; अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 03:04 PM2022-03-25T15:04:59+5:302022-03-25T15:05:24+5:30

बालकावर बारामतीच्या डॉक्टरांनी तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत श्वासनलीकेच्या वर अडकलेला चाव्यांचा जुडगा बाहेर काढला

An eighteen month old baby swallowed a bunch of bites Successful treatment by the doctor in just half an hour | अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा; अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी उपचार

अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा; अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी उपचार

googlenewsNext

बारामती : अठरा महिन्यांच्या बालकाने अनावधानाने चाव्यांचा जुडगा गिळल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण परीसरात नुकताच घडला. त्यानंतर अत्यवस्थ झालेल्या बालकाला बारामतीच्या श्रीपाल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. या बालकावर बारामतीच्या डॉक्टरांनी तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत श्वासनलीकेच्या वर अडकलेला चाव्यांचा जुडगा बाहेर काढला.

आरुष अतुल गुणवरे (वय १८ महिने) असे या बालकाचे नाव आहे. चाव्यांचा जुडगा गिळल्यानंतर आरुषला प्रथम भिगवण येथील दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉ. त्रिंबक मोरे, डॉ गाढवे यांनी तातडीने डॉ मुथा यांच्याशी संपर्क साधत त्याला बालरुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अत्यवस्थ अवस्थेत येथील श्रीपाल रुग्णालयात आणण्यात आले. आरुषला रुग्णालयात आणल्यावर त्याच्या तोंडातून रक्त आणि लाळ बाहेर येत होती. त्याचा जीव गुदमरण्यास सुरवात झाली होती. डॉ.राजेंद्र मुथा, डॉ.सौरभ मुथा यांनी परीस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने उपचार सुरु केले. त्याने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलीकेच्या वरील बाजूस अडकल्याचे डॉ. मुथा यांनी केलेल्या तपासणीत दिसून आले. त्यानंतर डॉ. मुथा यांनी तातडीने कान नाक घशाचे डॉ. वैभव मदने, भुलतज्ञ डॉ.अमर पवार यांना संपर्क साधत हा प्रकार सांगितले. त्यानंतर दोघे डॉक्टर रुग्णालयात पोहचले. आरुषला भुल देत दुर्बिणीद्वारे ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत चाव्यांचा जुडगा काढण्यात आला. अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी यशस्वी उपचार दिल्याने आरुषला जीवदान मिळाले.

डॉ राजेंद्र मुथा यांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला पालकांना दिला आहे. लहान मुलांपासुन लोखंडी,टोकदार वस्तु, केमिकल,औषधे, आदी दुर ठेवण्याचे आवाहन केले आहे.अन्यथा मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचा इशारा देखील दिला आहे.विशेषत: मोबाईलच्या आधीन गेलेल्या पालकांचे लहान मुलांकडे लक्ष नसल्याचे निरीक्षण डॉ. मुथा यांनी नोंदविले आहे.

Web Title: An eighteen month old baby swallowed a bunch of bites Successful treatment by the doctor in just half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.