Pune: लाइट कट केली म्हणून वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कोंढवा परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 03:50 PM2024-01-09T15:50:35+5:302024-01-09T15:51:22+5:30
बागवान याने वीजदेयक न भरल्याने शेख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते....
पुणे : वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण मधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. वकार अहमद मोहम्मद मुख्तार शेख (वय ३६, साईबाबानगर, कोंढवा खुर्द) यांनी या संदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अफजल बागवान (रा. गॅलेक्सी प्रीमियम सोसायटीसमोर, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बागवान याने वीजदेयक न भरल्याने शेख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. वीज मीटरवर कारवाईसाठी शेख गॅलेक्सी सोसायटीच्या आवारात पाेहोचले, शेख यांना बागवानने कानाखाली मारली. शेख यांच्यावर पाईप उगारला, शेख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.