पुण्यात तब्बल पावणेदहा कोटींचा अपहार; ‘लक्ष्मीबाई’च्या चेअरमनला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:50 AM2022-11-30T09:50:36+5:302022-11-30T09:51:29+5:30

संचालकांवर एमपीआयडी ॲक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल

An embezzlement of as many as fifty crores in Pune Chairman of Lakshmibai arrested | पुण्यात तब्बल पावणेदहा कोटींचा अपहार; ‘लक्ष्मीबाई’च्या चेअरमनला अटक

पुण्यात तब्बल पावणेदहा कोटींचा अपहार; ‘लक्ष्मीबाई’च्या चेअरमनला अटक

googlenewsNext

पुणे : कोथरूड येथील लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेत पावणेदहा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने संस्थेचे चेअरमन राजेंद्र बाबूराव पवार यांना अटक केली आहे. तसेच संचालकांवर एमपीआयडी ॲक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दीपक निकम, नियंत्रक अभिजित भोसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व इतर सहा संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अपर विशेष लेखापरीक्षक जे. एस. गायकवाड यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ऑगस्ट २०१५ ते ३१ मार्च २०२० दरम्यान घडला आहे.

अधिक माहितीनुसार, लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार निबंधकांनी दिले होते. या लेखापरीक्षणात पतसंस्थेच्या २०१५ ते २०२० या कालावधीत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी स्वत:च्या फायद्याकरीता, संचालक मंडळाची मंजुरी न देताच पदाचा दुरुपयोग करून संस्थेतील निधी अनामत खात्याद्वारे घेतला. त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत केली. या अपहारामुळे संस्था अडचणीत येणार असून, ही बाब निबंधक कार्यालयास कळविणे गरजेचे असतानासुद्धा कळविली नाही. तसेच नियंत्रक वैशाली पवार व अभिजित भोसले यांनी संगनमताने बोगस कर्ज नावे टाकून अपहार केला आहे.

दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, खात्याची बाकी कमी करून कमी व्याज आकारून अपहार करणे, बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न करून अपहार करणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रकमेचा अपहार करणे अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करून नऊ कोटी ७४ लाख ४० हजार १६९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणातून आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक इंदलकर तपास करीत आहेत.

Web Title: An embezzlement of as many as fifty crores in Pune Chairman of Lakshmibai arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.