लव्ह जिहाद नव्हे, पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी; तरुणीने नेमकं काय केले, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 11:06 PM2023-06-10T23:06:37+5:302023-06-10T23:11:57+5:30

लव्ह जिहाद, केरळ स्टोरी असे गंभीर विषय सध्या गाजत असताना त्यात पळवून नेणारा मुस्लिम धर्मिय म्हटल्यावर पोलिसांचे धाबे दणाणले.

An incident happened in Pune where a young woman cheated the police by giving false information in the office because she was angry with the police | लव्ह जिहाद नव्हे, पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी; तरुणीने नेमकं काय केले, पाहा!

लव्ह जिहाद नव्हे, पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी; तरुणीने नेमकं काय केले, पाहा!

googlenewsNext

पुणे : प्रेमसंबंधातून २२ वर्षाच्या आपल्या मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेले असून तिला तेथे डांबून ठेवले आहे. तिने लोकेशन पाठविले असल्याची तक्रार एका तरुणीने आपल्या ऑफीसमध्ये केली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. लव्ह जिहाद, केरळ स्टोरी असे गंभीर विषय सध्या गाजत असताना त्यात पळवून नेणारा मुस्लिम धर्मिय म्हटल्यावर पोलिसांचे धाबे दणाणले.

पोलीस पथक पहिल्या विमानाने दिल्लीत पोहचले. त्यांनी लोकेशनवर शोध घेतला तर या तरुणीची मैत्रिणी आढळून आली. मात्र, तिच्याबाबत असा कोणताही प्रकार झाला नव्हता. त्यामुळे पोलिस चक्रावून गेले. पुन्हा पुण्यातील या तरुणीची आपल्या पद्धतीने विचारणा केल्यावर तिने पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले.

याबाबत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले की, याबाबतची तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी त्यावरुन उदभवणार्या सामाजिक प्रश्नाचा विचार करुन तातडीने दिल्लीला पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे यांचे पथक पाठविले. तेथे चौकशी केल्यावर हा सर्व उलघडा झाला. पुण्यात माहिती देणार्या प्रणाली नावाच्या मुलीचा ब्रेकअप झाला होता. तिचा बॉय फ्रेड तिला त्रास देत होता. त्यावेळी तिने ११२ वर कॉल केला होता. परंतु, तिला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यावरुन ती पोलिसांवर चिडून होती. त्यामुळे तिने हा प्लॅन रचला. पोलिसांचा विश्वास बसावा, म्हणून तिने दिल्लीतील आपल्या मैत्रिणीला काही न सांगता केवळ तिचे लोकेशन मागून घेतले होते. त्यामुळे पोलिसांची मात्र धावपळ झाली.

Web Title: An incident happened in Pune where a young woman cheated the police by giving false information in the office because she was angry with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.