पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:45 AM2024-05-07T09:45:30+5:302024-05-07T09:45:43+5:30

हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस-पाषाण रस्त्यावर शनिवारी (दि. ४) हा प्रकार घडला....

An incident in Ganda, Hinjewadi area, claiming that the parcel contained narcotics | पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना

पिंपरी : मुंबईहून तैवान येथे पाठवण्यासाठी तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत, असे अज्ञातांनी महिलेला सांगितले. पार्सल मुंबई कस्टम आणि मुंबई पोलिसांनी पकडले असल्याचे सांगून तिची १० लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस-पाषाण रस्त्यावर शनिवारी (दि. ४) हा प्रकार घडला.

याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने रविवारी (दि. ५) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित मोबाइल क्रमांक धारक आणि मुंबई नार्कोटिक्स सेल नावाचा स्काईप आयडी धारक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी महिलेस फोन केला. महिलेचे नाव आणि आधार क्रमांकावर मुंबई ते तैवान येथे पाठवण्यासाठी एक बेकायदेशीर पार्सल आले असून त्यात कपडे, लॅपटॉप आणि ६०० ग्रॅम एमडी ड्रग्ज आहे. ते पार्सल मुंबई कस्टम आणि मुंबई पोलिसांनी पकडले आहे. तुमची चौकशी करायची आहे. तुमचे आधारकार्ड तीन वेगवेगळ्या क्रिमिनल अकाउंटशी लिंक आहे, असे संशयितांनी खोटे सांगितले.

संशयितांनी स्काइप आयडीवरून फिर्यादीस व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. फेडेक्स कुरिअर कंपनीमध्ये कुरिअरची लिंक काढायची असेल तर पाच लाख रुपये आम्ही सांगू त्या खात्यावर पाठवावे लागतील, असे फिर्यादी महिलेस संशयितांनी सांगितले. त्यानंतर महिलेस आरबीआयचे बनावट पत्र पाठवून त्यांच्याकडून व्हेरिफिकेशनच्या नावाखाली १० लाख ४९ हजार ३६० रुपये घेत त्यांची फसवणूक केली.

Web Title: An incident in Ganda, Hinjewadi area, claiming that the parcel contained narcotics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.