शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; शिक्षकाचे सातवीच्या 13 मुलींसोबत विकृत चाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:19 PM2022-08-30T12:19:35+5:302022-08-30T12:19:42+5:30

शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली

An incident that tarnishes the teaching profession Teacher abuse with 13 girls Class VII | शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; शिक्षकाचे सातवीच्या 13 मुलींसोबत विकृत चाळे

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; शिक्षकाचे सातवीच्या 13 मुलींसोबत विकृत चाळे

Next

मंचर : आंबेगाव तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पूर्व भागातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बाबाजी उमाजी घोडे (रा.निमगाव सावा) याने इयत्ता सातवीच्या अल्पवयीन 13 मुली सोबत विकृत चाळे केले आहेत. याप्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी केंद्रप्रमुख यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षक बाबाजी उमाजी घोडे (रा निमगाव सावा) हा इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या छातीला हात लावणे, खांद्यावर हात ठेवणे, मुलांना टेबलासमोर उभे करून बोलणे, मुलींना त्यांच्या खुर्ची जवळ बोलावून त्यांना स्पर्श करून बोलणे अशाप्रकारे त्यांचा लैंगिक छळ करत होता. जून महिन्यापासून असा प्रकार सुरू होता. याप्रकरणी मुलींनी आपल्या पालकांना याबाबत सांगितले असता, पालकांनी 24 ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन या संदर्भात तक्रार केली. शाळेने या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला. पठारे यांना काही पालकांनी फोन करून आपबिती सांगितली होती. त्यांनी या प्रकरणी एक समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. या समितीने मुलींशी संवाद साधत चौकशी केली. समितीने सातवीच्या वर्गातील अठरा मुलींची चौकशी केली. त्यातील तेरा मुलीबाबत हा प्रकार घडला असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या शिक्षकावरील आरोप सिद्ध झाला आहे. सदर शिक्षकास गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्या आदेशाने निलंबित केले आहे. शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नराधम शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत.

यासंदर्भात गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले की, आंबेगाव तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन जनजागृती करणार आहोत. जनजागृतीमुळे विद्यार्थिनी पालक तक्रार करण्यास पुढे येतील त्यामुळे आशा घटना घडणार नाही. शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र काम करावे. मुलांना मारहाण तसेच गैरप्रकार होणार नाही. याची काळजी घ्यावी असे आवाहन पठारे यांनी केले आहे.

Web Title: An incident that tarnishes the teaching profession Teacher abuse with 13 girls Class VII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.