मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 08:56 PM2022-02-09T20:56:28+5:302022-02-09T20:56:36+5:30

महाविद्यालयात लता मंगेशकर यांच्या नावाने याच महाविद्यालयात मोठे संग्रहालय उभे केले

An international music college named after lata mangeshakar in Mumbai Announcement by Uday Samant | मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा

मुंबईत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय; उदय सामंत यांची घोषणा

Next

पुणे : मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाऐवजी आता मुंबईत भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे,अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात लता मंगेशकर यांच्या नावाने याच महाविद्यालयात मोठे संग्रहालय उभे केले जाईल,असेही सामंत यांनी यावेळी नमूद केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार उपस्थित होते. 

सामंत म्हणाले,मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी ज्येष्ठ संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने मुंबई विद्यापीठात संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा अहवाल दिला होता. मात्र, दूर्दैवाने मुंबई विद्यापीठातील जागा या महाविद्यालयाला मिळू शकली नाही. त्यामुळे विद्यापीठाजवळील तंत्र शिक्षण विभागाची तीन एकर जागा या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच समितीने केलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.

महाविद्यालयात भव्य संग्रहालय उभारले जाणार

लता मंगेशकर यांना सत्तर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मिळालेल्या वस्तू त्यांच्या कुटुंबियांनी जतन करून ठेवल्या आहेत. त्या वस्तू ठेवण्यासाठी याच महाविद्यालयात भव्य संग्रहालय उभारले जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक बोलीभाषेतील गाणे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर गायल्या जाणा-या गाण्याचा अभ्यास या संगीत महाविद्यालयात करता यावा,अशी लता मंगेशकर यांनी इच्छा होती. त्यानुसार शासनातर्फे लवकरच महाविद्यालय भारणीचे काम केले जाणार आहे,असेही सामंत यांनी सांगितले.

Web Title: An international music college named after lata mangeshakar in Mumbai Announcement by Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.