वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून खून; तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 19:57 IST2023-08-11T19:56:41+5:302023-08-11T19:57:45+5:30
पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे...

वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून खून; तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. महिलेचे वय अंदाजे ७५ ते ८० वर्षे आहे. महिलेची ओळख अजून पटलेली नाही. ही घटना गुरुवारी (दि.१०) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. महिलेचा मृतदेह वारंगवाडी येथील माळरानातील गवतात मिळून आला. याप्रकरणी रामदास विठ्ठल धुमाळ (वय ३६, रा. वारंगवाडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ७५ ते ८० वय असलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. महिलेची ओळख पटली नाही. महिलेची उंची चारसाडे फूट असून, तिच्या अंगावर लाल रंगाची फुलांची डिझाईन असलेली सहावारी साडी आहे. महिलेच्या कपाळावर गोंदण आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.