एखाद्या साथीचा उद्रेक भीतीदायक; साथरोगांवर नियंत्रणासाठी आता स्वतंत्र कमांड ॲड कंट्रोल सेंटर
By राजू हिंगे | Published: January 18, 2024 02:26 PM2024-01-18T14:26:38+5:302024-01-18T14:27:14+5:30
कोरोना साथीनंतर मोठ्या शहरांमध्ये साथरोगांबाबत उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात नियोजनाच्या उद्देशाने सेंटर उभारणार
पुणे : महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू तसेच इतर काही साथरोगांचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या च्या माध्यमातून पुणे शहरासाठी बाणेर येथील पालिकेच्या नवीन रूग्णालयात आता स्वतंत्र कमांड ॲड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे.
कोरोना साथीनंतर मोठ्या शहरांमध्ये साथरोगांबाबत उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात अशा वेळी नियोजन करण्याच्या अनुषंगाने केंद्राकडून ही सेंटर उभारली जात आहेत. मोठया शहरांमध्ये दैनंदिन उपचारसाठी येणार्या नागरिकांची संख्या मोठया प्रमाणात असते. मात्र, त्याची दैनंदिन माहिती संकलित करण्यात येत नाही. त्याची नोंदही आरोग्य विभागाकडे ठेवली जात नाही. त्यामुळे एखाद्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ होते. त्यानंतर माहिती संकलित करून त्यानुसार उपाय योजना केल्या जातात.
पुण्यातील शासकीय आणि खासगी रूग्णालयात दाखल होणार्या दैनंदिन रूग्णांच्या माहितीचे संकलन तसेच विश्लेषण करून त्यानुसार, आरोग्य व्यवस्थेसाठीच्या उपाय योजनांचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे.तोपर्यंत मोठी हानी झालेली असते.ही बाब लक्षात घेउन या सेंटरच्या माध्यमातून आता खासगी तसेच शासकीय रूग्णालयातील रूग्णांची दैनंदिन माहिती संकलित करून दररोज या माहितीचे विश्लेषण केले जाणार आहे,अशी माहिती पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली.