न्हावरे येथे फटाके फोडून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:42+5:302021-07-11T04:09:42+5:30
दुपारी कोरेकर यांचे न्हावरे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोषात त्यांचे स्वागत केले . ...
दुपारी कोरेकर यांचे न्हावरे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोषात त्यांचे स्वागत केले . मल्लिकार्जुन मंदिरात झालेल्या छोटेखनी सभेत वसंतराव कोरेकर यांचा विविध संस्थांच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी घोडगंगाचे संचालक गोविंदराजे निंबाळकर , बाळासाहेब कोरेकर पाटील , गौतम कदम , प्रकाश बहिरट , गोपाळ हिंगे , अरुण तांबे , नारायण कांडगे , सुभाष कांडगे , चंद्रकांत आनंदे , कविता बिडगर , शहाजी जाधव , जयवंतराव कोकडे , बाळासाहेब खंडागळे , सुभाष कोकडे , संदीप यादव , तात्यासाहेब शेंडगे , नरहरी कोरेकर , शहाजी खंडागळे , विकास बोथरा , इक्बाल शेख , महादेव जाधव , बिरा शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव कोरेकर यांच्यारुपाने न्हावरे गावाला तब्बल ६१ वर्षानंतर सभापती पदाची संधी मिळाली आहे .याअगोदर न्हावरे येथील रामचंद्रराजे निंबाळकर १९६० साली शिरूर बाजार समितीचे सभापती होते . वसंतराव कोरेकर हे शिरूर बाजार समितीत सर्वात जेष्ठ संचालक असून त्यांनी या अगोदर दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य , व जिल्हा परिषदेतच स्थायी समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे . २००४ साली जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या सभापती पदासाठी त्यांचे नाव चर्चेत आले होते . मात्र त्यावेळी त्यांची ती संधी हुकली होती .
वसंतराव कोरेकर सारख्या सर्वसामान्यातून आलेल्या एका जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षश्रेष्ठींनी सभापती पदाची संधी दिल्याने न्हावरे परिसरासह शिरूर तालुक्यातील ग्रामस्थांनी व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
न्हावरे ( ता.शिरूर ) येथे वसंतराव कोरेकर यांची सभापती पदावर निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना ग्रामस्थ .