Anant Chaturdashi 2022| अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास
By विश्वास मोरे | Published: September 9, 2022 02:32 PM2022-09-09T14:32:41+5:302022-09-09T14:33:44+5:30
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी शहरातील गणेश मंडळांना भेट भेट देऊन आरती केली...
पिंपरी: राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गुरुवारी सुमारे आठ तास शहरातील ३० मंडळांना भेट देऊन आरती केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मनसेचे नेते राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी शहरातील गणेश मंडळांना भेट भेट देऊन आरती केली. ठाकरे यांनी आरतीचा तास उपक्रम राबवला.
मनसे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली व गणपती चे दर्शन घेतले. मोशी, इंद्रायणी नगर, खराळवाडी, राम नगर, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, डांगे चौक गणेश नगर, किवळे या ठिकाणच्या काही मंडळाना भेट दिली. त्यात अष्टविनायक मित्र मंडळ मोशी, त्रिमुर्ती मित्र मंडळ - मोशी,सिद्धिविनायक मित्र मंडळ - भोसरी इंद्रायणीनगर, श्रीराम मित्र मंडळ - राम नगर चिंचवड, जय हनुमान मित्र मंडळ पिंपरी - खराळवाडी,चिंचवडगाव - नवतरुण मित्र मंडल, पवनासागर मित्र मंडळ - पिंपरीगाव, पंचनाथ मित्र मंडळ काळेवाडी - पाच पिर चौक, मयुरबाग मित्र मंडळ - डांगे चौक चिचंवड, बापदेव मित्र मंडळ - किवळे रावेत येथे भेट दिली.
यावेळी शहर अध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर,विशाल मानकरी,दत्ता देवतरासे, प्रतिक शिंदे, श्रध्दा देशमुख, अक्षय नाळे , नारायन पठारे , प्रकाश त्रिमले , सुदिर जम , रेखा जम , सचिन शिंगाडे , विनोद भंडारी , सुशिल पोतदार , सगिता देशमुख , सुजाता काटे , सुशिल नेटके , सतिश कदम , राजु भालेराव , पुणे शहर पदाधिकारी प्रंशात कनोजिया , आशिष साबळे , अमोल शिंदे सागर कुलकर्णी उपस्थित होते.