Anant Chaturdashi 2022| बाप्पाच्या निरोपासाठी 'देवदूत'ही सज्ज; दीड हजारांहून जास्त पोलिसांचा बंदोबस्त
By नारायण बडगुजर | Published: September 9, 2022 05:30 PM2022-09-09T17:30:47+5:302022-09-09T17:31:56+5:30
शगुन चौकात पोलिसांचा फौजफाटा
पिंपरी : बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज आहे. पिंपरी -चिंचवड शहरात ३६ पेक्षा जास्त विसर्जन घाट आहेत. या घाटांवर महापालिका कर्मचारी, ग्रीन मार्शल, जीवरक्षक तसेच अग्निशामक विभागाचे जवान आणि पोलीस तैनात आहेत. अग्निशामक विभागातील 'देवदूत' हे वाहन प्रत्येक घाटावर जाऊन सज्जतेचा आढावा घेतला जात आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात दीड हजारांहून जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच महापालिकेचा अग्निशामक विभाग देखील अलर्ट आहे. अग्निशामक विभागाच्या दीडशे जवानांकडून प्रत्येक घाटावर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. अग्निशामक बंब देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. घाटांवर जीवरक्षक असून लाईफ जॅकेट, लाइफ रिंग, दोरखंड यासह आवश्यकतेनुसार बोट देखील उपलब्ध आहेत.
नदीत विसर्जनास मनाई
पवना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. असे असले तरी नदीत विसर्जनास मनाई करण्यात आली आहे. नदीच्या घाटावर हौदात विसर्जन करण्यात येत आहे.
शगुन चौकात पोलिसांचा फौजफाटा
पिंपरी येथे सायंकाळी गर्दी होऊन मिरवणुकीत रंगत येते. त्यासाठी शगुन चौकात दुपारी चारच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. महापालिकेच्या कक्षातर्फे शगुन चौकात मंडळाचे स्वागत केले जाते आहे.