Anant Chaturdashi 2022| लष्कर ठाण्याच्या बाप्पाचे उत्साहात विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 04:50 PM2022-09-09T16:50:54+5:302022-09-09T16:51:06+5:30
लष्कर ( पुणे ) : पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्षी लष्कर पोलीस ठाण्यात प्राणप्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तीचे मोठ्या आनंदाने नाचत-गात ...
लष्कर (पुणे) : पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्षी लष्कर पोलीस ठाण्यात प्राणप्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तीचे मोठ्या आनंदाने नाचत-गात निरोप दिला. राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळील बोर्डाच्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
दरवर्षी लष्कर पोलीस ठाण्यात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यादरम्यान दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणेशाची आराधना ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने करतात. यंदाही हीच परंपरा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या नेतृत्वात पूर्ण केली गेली, गणेशोत्सवाचा काळात वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला यांच्यावतीने आरती केली जाते.
कोरोनाच्या निर्बंध उठवल्यानंतर आज प्रथमच अशोक कदम यांच्या नेतृत्वात गणपतीची विसर्जन मिरवणूक, ढोल ताशे यांच्या गजरात, पोलीस महिला, पुरुष कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नाचत गात कृत्रिम हौदात करण्यात आली. यावेळी कदम यांनी गणेश मूर्तीची आरती करून नंतर मूर्ती विसर्जित करण्यात आली