Anant Chaturdashi 2022| पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त मध्यभागातील रस्ते बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 12:05 PM2022-09-09T12:05:59+5:302022-09-09T12:06:47+5:30
वाहनचालकांसाठीचा वर्तुळाकार मार्ग
पुणे : विसर्जन मिरवणुकीनिमित्त शुक्रवारी (दि. ९) मध्यभागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर विसर्जन मार्ग तसेच मध्यभागातील रस्ते शनिवारी वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख रस्ते शुक्रवारी सकाळी सातनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.
बंद असणारे रस्ते :
शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक
बाजीराव रस्ता - बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौक
कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे बंधू मिठाईवाले, शनिपार
गणेश रस्ता - दारूवाला पूल चौक ते जिजामाता चौक
बगाडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक
केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक
गुरूनानक रस्त - देवजीबाबा चौक ते हमजे खान चौक, हमजे खान चौक ते गोविंद हलवाई चौक
टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक
शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलीस चौकी तसेच टिळक चौक
जंगली महाराज रस्ता - झाशीची राणी चौक ते खंडुजीबाबा चौक
शुक्रवारी दुपारी बारानंतर बंद करण्यात येणारे रस्ते :
कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक ते खंडुजीबाबा चौक
फर्ग्युसन रस्ता - खंडुजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय
भांडारकर रस्ता - पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक, नटराज चौक
पुणे-सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक
सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
वाहनचालकांसाठीचा वर्तुळाकार मार्ग
कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, वेधशाळा चौक, संचेती हॉस्पिटल चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरू रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, शिवनेरी रस्त्यावरील गुलटेकडी मार्केटयार्ड, मार्केटयार्ड चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल चौक, लाल बहादूर शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलीस चौकी, अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल ते नळस्टॉप.
वाहने लावण्याची ठिकाणे :
- एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुलाची वाडी नदी किनारी, पूरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या बाजूला, दारूवाला पूल ते खडीचे मैदान, गाडगीळ पुतळा ते कुंभार वेस, काँग्रेस भवन ते महापालिका भवन रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा वाहनतळ नारायण पेठ.