अनंतराव गोगटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:41+5:302021-04-21T04:11:41+5:30
गोगटे यांचा बांधकामाचा व्यवसाय होता. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मुख्य इमारत, चिकलठाणा विमानतळ तसेच पुणे येथील ...
गोगटे यांचा बांधकामाचा व्यवसाय होता. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मुख्य इमारत, चिकलठाणा विमानतळ तसेच पुणे येथील रिझर्व बँकेची इमारत, बालभारती, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला इत्यादींच्या बांधकामांत त्यांचा सहभाग होता. तसेच अनेक घरे आणि बंगले हेही त्यांनी बांधलेले आहेत.
१९८५ ते २००० या काळात पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून ते निवडून आले. १९९५ साली ते रा. स्व संघाचे पुणे महानगराचे कार्वाह होते. त्यानंतर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले. रायगड रोपवे आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची रायगडाला भेट या त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या महत्त्वाच्या बाबी आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक परिषदेचे सदस्य म्हणून २००३ ते २००५ या काळात त्यांनी काम पाहिले. तसेच संस्थेच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष म्हणून २००८ ते २०११ या काळात ते कार्यरत होते.