अनफिट कचरा वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:54 AM2017-07-31T04:54:01+5:302017-07-31T04:54:01+5:30

अत्यंत जुनाट भासणा-या आणि केव्हाही मान टाकेल अशा गाड्यांमधून कच-याची वाहतूक करताना महापालिकेच्या गाड्या सर्रास दिसतात.

anaphaita-kacaraa-vaahanaanvara-kaaravaai | अनफिट कचरा वाहनांवर कारवाई

अनफिट कचरा वाहनांवर कारवाई

Next

पुणे : अत्यंत जुनाट भासणा-या आणि केव्हाही मान टाकेल अशा गाड्यांमधून कच-याची वाहतूक करताना महापालिकेच्या गाड्या सर्रास दिसतात. या गाड्या खरेच वाहतुकीस सक्षम आहेत, की नाही, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती या गाड्यांची असते. या गाड्यांबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) या वाहनांची तपासणी करून, कारवाई करण्याचे आदेश भरारीपथकाला दिले आहेत.
आारटीओच्या वतीने अवजड वाहने, रिक्षांची क्षमता तपासणी (फिटनेस) करून घेणे बंधनकारक असते. या क्षमता चाचणीत दोष आढळल्यास ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. आवश्यकता भासल्यास संबंधित वाहन पुढे तोडले (स्क्रॅप) देखील जाते. शहरात
कचरा वाहतूक करणा-या गाड्यांकडे पाहिल्यास यातील बहुतांश कंटेनर आणि कचरा वाहतूक करणाºया गाड्यांनी अशी कोणती तपासणी केलीच नसेल, असे दिसते. समजा अशी तपासणी केली असल्यास दोष नक्की दूर केले नसतील, असे वाहनांच्या स्थितीवरून दिसून येते.
या पूर्वी देखील अशा वाहनांमुळे जीवघेणे अपघात घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटीओकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. वारंवार होणाºया अशा तक्रारींमुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी शहरातील कचरा वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण न करताच महानगरपालिकेची वाहने कचºयांची वाहतूक करीत आहेत, अशी वाहने तांत्रिकदृष्ट्या वाहतुकीस योग्य नाहीत. त्यामुळे वायूवेग (भरारी) पथकातील मोटार वाहन निरीक्षकांनी अशा वाहनांवर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल सहायक
परिवहन अधिकाºयांनी खटला विभागामार्फत सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: anaphaita-kacaraa-vaahanaanvara-kaaravaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.