मनजितसिंग वीरदी फाउंडेशनची लंगर सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:10+5:302021-05-23T04:10:10+5:30
गतवर्षीच्या लाॅकडाऊनमधील जवळपास १०० दिवस व यावर्षी आता सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये रोज ३०० ते ४०० गरजू नागरिकांना फाउंडेशनच्या ...
गतवर्षीच्या लाॅकडाऊनमधील जवळपास १०० दिवस व यावर्षी आता सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये रोज ३०० ते ४०० गरजू नागरिकांना फाउंडेशनच्या वतीने अन्नदान व रेशन किटचे वाटप करण्यात येत आहे. पुण्यातील सेंट मेरी कॅम्प, एम. जी. रोड, वानवडी, फातिमानगर, विमाननगर, कौसरबाग, एनआयबीएम, शिवाजी मार्केट व इतर झोपडपट्टी असलेल्या भागातील गरजू नागरिकांना लंगर सेवा देण्यात आली.
मनजितसिंग वीरदी व मिरेया फाउंडेशनच्या कार्याला गुरुद्वारा गुरुनानक दरबार व गुरुद्वारा गुरुसिंग सभा गणेश पेठ यांच्यावतीने मोलाचे सहकार्य करण्यात येत आहे. एप्रिल, मेमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनध्ये मेरिया फाउंडेशनचे मनप्रीत व रिदेमा यांच्याकडून गरजूंना सकाळचा नाश्ता व चहा देण्याबरोबर मास्क, सॅनिटायजर व ग्लोव्ह्जचे वाटप करण्यात आले.
फर्निचर व्यावसायिकाकडून गरजूंसाठी मदत
लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसायावर टांगती तलवार आलेली आहे. अशातच लष्कर भागातील जुना पुलगेट येथे असलेल्या मॉर्डन आर्ट फर्निचर या वानवडीतील फर्निचर व्यावसायिकाकडून व लकी प्रॉपर्टीजच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.