पिंपळवंडीत सापडले पुरातन रोमन जाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:01+5:302021-05-28T04:10:01+5:30
रस्त्याचे काम सुरु असताना दगडमातीत आयुब इनामदार व डॉ. संदीप रोहकले यांना एक घडीव दगड निदर्शनास आला. त्यांनी ...
रस्त्याचे काम सुरु असताना दगडमातीत आयुब इनामदार व डॉ. संदीप रोहकले यांना एक घडीव दगड निदर्शनास आला. त्यांनी या घडीव दगडाची माहिती पिंपळवंडी गावातीलच लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांना दिली. कसबे यांनी याबाबत पुरातत्व अभ्यासकांना माहिती विचारली असता हे जाते पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील असावे असे सांगितले.
इतिहास अभ्यासक अशोक नगरे यांनी हे जाते सातवाहन काळातील असून जुन्नरमध्ये अशी जाती यापूर्वीही सापडल्याची माहिती दिली. जुन्नर तालुक्यातील बोरी गावातही असे जाते सापडलेले आहेत. पिंपळवंडी हे गाव कुकडी नदीच्या किनारावर वसले असून २ हजार वर्षांपुर्वीच्या कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावरील हे महत्वाचे गाव होते.