...आणि ‘तो’ चोर जाळ्यात सापडला
By Admin | Published: February 12, 2015 11:49 PM2015-02-12T23:49:09+5:302015-02-12T23:49:09+5:30
आलिशान गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीतील एकाला गुरूवारी येथे नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
यवत : आलिशान गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीतील एकाला गुरूवारी येथे नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
येथील बँकेसमोर मोटाराची काच फोडून ५० हजारांची रक्कम काढून पळ काढत असताना युवकांनी एकाला पकडले. मात्र त्याच्या टोळीतील इतरजण रक्कम घेऊन त्यांच्या दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्या चोराला पकडण्यात वरवंड मधील युवक संजय जाधव यांनी लढविलेली शक्कल कामी आली.
पंधरा दिवसांपूर्वी जाधव हे हडपसर येथे गेले असताना त्यांच्या गाडीची काच फोडून रोख १५ हजार व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेली होती. त्यानंतर त्यांच्या गाडीचा पाठलाग दुचाकीवरील काही इसम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.
त्यामुळे चोरांना पकडण्यासाठी शक्कल लढ़विली. गाडीत बॅग ठेऊन ते यवत येथील बँकेसमोर आले. यांची माहिती या आधी त्यांनी गावातील युवकांना दिली होती. त्यानुसार चोरांना पकडण्यासाठी युवक तयारीत होते. जाधव बँकेत गेल्यानंतर संशयीत तेथे दबा धलन होते. दरम्यान दुसरी एक आलीशान गाडी तेथे आली. संशयितांपैकी एकाने त्या गाडीची पुढील काच फोडून आतील ५० हजाांची रोख रक्कम घेऊन पळ काढला. मात्र आधीच तेथे थांबलेल्या विजय जाधव , विलास पवार, सचिन दिवेकर, चंद्रकांत सातपुते, संतोष दिवेकर यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यातील एकाला पकडण्यात त्यांना यश आले. इतर चोरटे मात्र त्यांच्या दुचाकी वरुण पळाले. चोरट्याच्या दुचाकीची नागरिकांनी यावेळी तोडफोड केली तर चोरालाही चांगलाच चोप दिला. (वार्ताहर)