अन तो मागच्या बाकावर जाऊन बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:45+5:302021-05-17T04:09:45+5:30
ठिकाण-अर्थातच फर्ग्युसन कॉलेज. जुने मित्र मैत्रिणी, शिक्षक, मामा मंडळी, इतक्या वर्षानंतर एकत्र जमण्याचा वेगळा आनंद होता. कोण लहान-कोण मोठा, ...
ठिकाण-अर्थातच फर्ग्युसन कॉलेज. जुने मित्र मैत्रिणी, शिक्षक, मामा मंडळी, इतक्या वर्षानंतर एकत्र जमण्याचा वेगळा आनंद होता. कोण लहान-कोण मोठा, कसलाही भेद नव्हता. त्याच आठवणी, तेच हसणं-खिदळणं. सर्वांचाच उत्साह ओसांडून वाहत होता. अनेक जण विचारतं होते, ‘राजू येणारंय का?’ सांगता येत नव्हतं, पण कार्यक्रम सुरू होण्याच्या थोडाच वेळ आधी राजू पोहोचला. त्या वेळच्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या दोन खासदारांपैकी एक; युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष! तो आवर्जून आला. जुन्या मित्रांसोबत मागं एका बाकावर जाऊन बसला. ना कोणता तामझाम, ना कोणीतरी वेगळं असल्याचा आव.. लाल टी-शर्ट आणि जीन्स पँट! त्याला म्हटलं, ‘अरे पुढं ये की’. तेव्हा बोलला, ‘मी फर्ग्युसनचा विद्यार्थी म्हणून, तुमचा तेव्हाचा मित्र म्हणून आलोय. बस्स् तेवढंच.’
दिल्लीला त्याच्या घरी गेलो होतो तेव्हाही असाच अनुभव. निवांत गप्पा, ना कोणी मोठा असल्याचा आव. तो अभ्यासू, कर्तृत्ववान, सुसंस्कृत नेता होताच. त्याच्या त्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेकांना अनेक अनुभव असतीलच, पण तो मित्रांसाठी कसा होता, हे कदाचित माहीत नसेल, असं आपले मैत्र भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी व्यक्त केले.