..तर काश्मीरी पंडितांची घरवापसी शक्य : विनय सहस्त्रबुध्दे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:16 PM2018-12-04T13:16:43+5:302018-12-04T13:20:29+5:30

’काश्मीर’ हा फक्त संबंधित राज्यातील लोकांचाच प्रश्न नाही तर काश्मीरशी समस्त देशवासियांची नाळ जुळलेली आहे.

..And resignation of Kashmiri Pandits can be possible: Vinay Sahasrabuddhe | ..तर काश्मीरी पंडितांची घरवापसी शक्य : विनय सहस्त्रबुध्दे 

..तर काश्मीरी पंडितांची घरवापसी शक्य : विनय सहस्त्रबुध्दे 

googlenewsNext
ठळक मुद्देप्राणकिशोर कौल यांच्या ' रेडिओ काश्मीर अँड माय डेज इन ब्रॉडकास्टिंग' या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ’काश्मीर’ हा फक्त संबंधित राज्यातील लोकांचाच प्रश्न नाही तर काश्मीरशी समस्त देशवासियांची नाळ जुळलेली आहे. एकात्मकता, विकास हे विषय सरकारला आऊटसोर्स करू शकत नाही. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीसाठी सरकार प्रयत्न करत आहे, मात्र श्रीनगरमधील रहिवाशांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास काश्मिरी पंडितांची घरवापसी शक्य आहे, अशा शब्दांत खासदार आणि इंडियन सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्स ( आयसीसीआर) चे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी काश्मिरी जनतेला साद घातली. 
सरहद आणि चिनार पब्लिकेशन च्या वतीने प्राणकिशोर कौल यांच्या ' रेडिओ काश्मीर अँड माय डेज इन ब्रॉडकास्टिंग' या पुस्तकाचे प्रकाशन खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जम्मू काश्मीर अकादमी आॅफ आर्ट अँड लँग्वेज चे उपाध्यक्ष झफर इकबाल मनहान्स, दूरदर्शनचे माजी डायरेक्टर जनरल अशोक जायखानी तसेच सरहदचे संजय नहार उपस्थित होते.सहस्त्रबुद्धे म्हणाले, प्रशासन आणि सुशासनच्या नजरेतून पाहिले तर काश्मीर आणि महाराष्ट्र जनतेच्या स्थितीत फारसा फरक नाही. या राज्यांच्या विकासासाठी जे प्रयत्न झाले ते अपूर्ण झाले. आज देशात आकांक्षा विकासचा उदय होत आहे. काश्मीर जनताही त्याला अपवाद नाही.ही विकासाची भूक आहे त्याला मिटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ नकाशाला नकाशा जोडून राष्ट्र बनत नाही तर मन मनाशी जोडले जायला हवे. ज्यावेळी देशाच्या एकात्मकतेशी संबंधित प्रश्न येतात. त्यावेळी अशांत, अस्वस्थ परिस्थितीमध्ये लोकांचे हित संबंध निर्माण होतात . ही स्वअस्तित्वाची लढाई आहे. अन्य प्रदेशाप्रमाणे काश्मीर देखील देशाचे अविभाज्य अंग आहे. प्राणकिशोर कौल यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. ’ये दिल से लिखी हुई चीज है’  जीवनातले सुंदर क्षण परत आले असल्यासारखे वाटत आहे. खूप वेदनादायी कथा आहेत. काश्मीर पंडित बेघर झाले मुसलमानांची स्थिती पण वाईट आहे. लोक घरातून बाहेर पडत नाहीत. काश्मीर धगधगत आहे असे त्यांनी काश्मीरचे वर्णन केले.एकदा आॅल इंडिया रेडिओ काश्मीरवर ज्येष्ठ शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांची मुलाखत घेतली होती त्यांचा डुग्गीवाला ब्राम्हण होता. बिस्मिल्ला खान पाच वेळा नमाज पडायचे तर तो ब्राह्मण अंघोळ केल्याशिवाय जेवत नसे. पण जेव्हा ते एकत्रित वाजवायचे तेव्हा धर्माच्या भिंती कोलमडून पडायच्या अशी आठवण कौल यांनी सांगितली.झफर इकबाल मनहान्स म्हणाले, देशाला राजकारणासाठी वापरले जात आहे. ते जेव्हा होणे थांबेल तेव्हा ख-या अर्थाने देश कळेल. काश्मीरकडे  अहंकार, रागातून बघितले जात आहे. काश्मीरचा मुद्दा हाताळताना काहीतरी चूक झाली आहे.१९९० मध्ये एक वादळ आले त्यात जीवितहानी फक्त झाली नाही पण खूप गोष्टी उजेडात आल्या. आपल्याला आपला देश वाचवायचा आहे. प्राणकिशोर हे आमच्यासाठी एक रोल मॉडेल आहेत. देशाच्या प्रती गद्दारी करणार नाही एवढीच भावना सर्वांच्या मनात असली पाहिजे. 
---------------------------------------------------------

Web Title: ..And resignation of Kashmiri Pandits can be possible: Vinay Sahasrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.