...अन रस्ता झाला माेकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 03:55 PM2018-06-27T15:55:09+5:302018-06-27T16:00:58+5:30
लाेकमतच्या वृत्ताची दखल घेत वाकडेवाडी येथील बजाज शाेरुम समाेरी रस्त्यावर वाहने लावण्यास मज्जाव करण्यात अाला अाहे.
पुणे : पुण्यातील वाकडेवाडी भागातील बजाज शाेरुम समाेरील रस्त्यावर नाे पार्किंगची पाटी असतानाही त्या पाटीच्या खालीच सर्रास वाहने लावली जात हाेती. त्याबाबतची बातमी मंगळवारी लाेकमतने प्रसिद्ध केली हाेती. त्या बातमीची दखल घेत अाता या ठिकाणी वाहने लावण्यात प्रतिबंध करण्यात अाला असून दाेन बॅरिगेट्स ठेवून वाहन न लावण्याच्या सूचना करण्यात अाल्या अाहेत.
वाकडेवाडी भागामध्ये पदपथ व रस्त्याची मांडणी नव्याने करण्यात अाली अाहे. या भागात असणाऱ्या बजाज शाेरुम समाेरील सर्विस रस्त्यावर सर्रास वाहने लावली जात हाेती. या ठिकाणी नाे पार्किंगची पाटी लावली असतानाही त्या खालीच वाहने राजराेसपणे लावण्यात येत हाेती. वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने या ठिकाणी अघाेषित पार्किंग झाली हाेती. सर्विस राेड बराेबरच पदपथावरही माेठ्याप्रमाणावर वाहने लावण्यात येत हाेती. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागत हाेते. येथील रस्ता हा जुना मुंबई-पुणे हायवे असल्याने या ठिकाणी वाहने वेगात जात असतात. अशातच एखाद्या वाहनाची पादचाऱ्यांना धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. तसेच या ठिकाणावरुन जाणाऱ्या वाहनांनाही या अघाेषित पार्किंगमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. याबाबतचे वृत्त लाेकमतने नाे पार्किगच्या बाेर्डखालीच पार्किंग या शिर्षकाखाली प्रसिद्ध केले हाेते. या वृत्ताची दखल घेत येथील वाहने अाता हटविण्यात अाली अाहेत.
दरम्यान, बजाज शाेरुम समाेरील वाहने हटवली असली तरी शाेरुमच्या शेजारील पदपथावरील वाहने तशीच अाहेत. त्यामुळे त्यांच्यावर कधी कारवाई हाेणार असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.