...आणि ‘ती’ बोहल्यावरून पळून गेली

By admin | Published: November 18, 2016 05:54 AM2016-11-18T05:54:28+5:302016-11-18T05:54:28+5:30

वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले.

... and 'she' escaped from Bohlia | ...आणि ‘ती’ बोहल्यावरून पळून गेली

...आणि ‘ती’ बोहल्यावरून पळून गेली

Next

मंचर (जि.पुणे) : वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले. लग्नाचे विधीही सुरू झाले. अखेर अल्पवयीन वधूने १०० नंबरवर संपर्क साधून हा प्रकार पोलिसांना कळविला. मात्र हे कळताच विधी उरकण्याची लगबग सुरू झाली. हार घालण्याची बळजबरी होताच ती बोहल्यावरून पळाली.
ही घटना आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी मुलीचे आई, वडील, मध्यस्थ, मुलगा व त्याचे आई वडील अशा सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलीने स्वत: फिर्याद दिली आहे. हातावर पोट असलेल्या तिच्या आई-वडिलांनी नागापूर येथील लक्ष्मण गायकवाड यांचा मुलगा पंकेश याच्याबरोबर तिचा विवाह निश्चित केला होता. दसऱ्याला टिळा लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिने कायद्यानुसार वय कमी असल्याने माझा विवाह करु नका, असे आई-वडिलांना समजावून सांगितले. परंतु, आपली परिस्थिती गरिबीची आहे. समोरील लोक सर्व खर्च करणार आहेत, तेव्हा तू गप्प राहा, अशी तिची समजूत घालण्यात आली. आज तिचा विवाह समारंभ होता. दुपारी लग्न होण्यापूर्वी तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून मंचर पोलीस ठाण्यात १०० क्रमांकावर संपर्क साधला आणि माहिती दिली. दरम्यान, पोलीस येत असल्याचे कळताच लग्नाचा विधी लवकर करण्याचे ठरले. मुलाच्या गळ्यात हार घाला,असे म्हणताच या बहाद्दर मुलीने पळ काढला. तिचे होणारे सासरे तिच्या मागे पळत आले. त्यांनी आम्ही खर्च केला आहे, तू लग्न कर, असे सुनावले. मात्र ती बधली नाही. (वार्ताहर)

Web Title: ... and 'she' escaped from Bohlia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.