...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही
By विश्वास मोरे | Published: September 8, 2023 11:36 AM2023-09-08T11:36:12+5:302023-09-08T11:51:38+5:30
वाहनामध्ये असणारे लॅपटॉप कॉम्प्युटर इतर साहित्याचे नुकसान
पिंपरी: सकाळी पावणे अकराची वेळ..., यमुनानगराकडून केएसबी चौकाकडे जाणारे रस्त्यावर अचानक शॉर्टसर्किट झाल्याने मारुती व्हॅनने पेट घेतला. यामध्ये गाडी जळून खाक झाली आहे. यामध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित संबंधित वाहन आरटीओसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचे आहे. मारूती व्हॅन (वाहन क्रमांक एम एच 12 ए एक्स 5787) चिंचवड करून आरटीओ कडे जात होते. त्यावेळी कमलनयन बजाज स्कूल समोरील रस्त्यावर मारुती व्हॅन चालली होती. त्यावेळी अचानक यांनी पेट घेतला. ही बाब मागील वाहनांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहन चालकाला सांगितले. त्यानंतर चालकाने वाहनातून उडी मारली. वाहनाला आग लागल्याची बाब लक्षात आल्यानंतर सतर्क नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले त्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी आले व त्यांनी आग विझवली यामध्ये वाहनाचे नुकसान झालेले आहे. वाहनांमध्ये असणारे लॅपटॉप कॉम्प्युटर इतर साहित्याचे नुकसान झाले आहे.
थरमॅक्स चौकाजवळीक नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल चे जवळ आज सकाळी शॉक सर्किट मुळे गाडीने अचानक पेट घेतला वेळीच मी अग्निशामक दलाला फोन करून पाचरण करण्यात आले, त्यामुळे पुढील घटना टळली, चालकाच्या प्रसंगावधनामुळे गाडीने पेट घेताच त्याने गाडीतून उडी मारली, त्यामुळे कुठलीही इजा झाली नाही, परंतु गाडीमध्ये असलेल्या लॅपटॉप व इतर सामान संपूर्णतः जळून खाक झाले ,नागरिकांना विनंती आपली गाडीला जास्त वर्ष झाले असेल तर त्याचे वेळेस चेक करावेत जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिली