HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 25, 2023 05:36 PM2023-05-25T17:36:19+5:302023-05-25T17:36:33+5:30

हसरे चेहरे आणि आनंदाने महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते

...And the fear of the students is over! The result of Pimpri Chinchwad city is 94.44 percent | HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के

HSC Exam Result:...अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.४४ टक्के

googlenewsNext

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.२५) दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली. ‘हिप हिप हुर्रर्रर्रर्र' असा आवाज सगळीकडे घुमला...पिंपरी चिंचवड शहराचा ९४.४४ टक्के निकाल लागला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत निकाल घटला आहे. दरम्यान, निकाल पाहण्यासाठी शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गर्दी पाहायला मिळाली.

निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष सुरू केला अन् सगळीकडे एकच जोश निर्माण झाला. एकमेकांना शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यश मित्र-मैत्रिणींबरोबर सेलिब्रेट केले. कोणी पेढे वाटून, तर कोणी एकमेकांना हस्तांदोलन करून बारावीच्या यशाच्या शुभेच्छा दिल्या. हसरे चेहरे आणि आनंदी चेहऱ्यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते. एकूणच यंदाच्या निकालांमुळे सगळ्याच महाविद्यालयात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला.

निकाल पाहण्याची शाळेत सोय...

यंदा शाळेच्या आवारात किंवा कॅफेत मुलांची गर्दी पाहायला मिळाली नाही. बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाईल, लॅपटॉपवर निकाल पाहिला. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशांसाठी खास शाळांमध्ये व्यवस्था केली होती.

बारावी निकाल दृष्टीक्षेपात...

परिक्षेस नोंदणी झालेले विद्यार्थी : १८ हजार ७६
परिक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी : १७ हजार ९७५
बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : १६ हजार ९७६
एकूण निकाल : ९४.४४

Web Title: ...And the fear of the students is over! The result of Pimpri Chinchwad city is 94.44 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.