आणे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:26 AM2018-04-07T02:26:53+5:302018-04-07T02:26:53+5:30
आणे येथे सुरू असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह आळेफाटा पोलीस व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखला.
आणे - येथे सुरू असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह आळेफाटा पोलीस व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून रोखला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उदरनिर्वाहानिमित्त आणे येथे आलेल्या एका कुटुंबातील मुलीचा विवाह जुन्नर तालुक्यातील एका मुलाशी गुरुवारी (दि. ५) दुपारी आयोजित करण्यात आला होता.
मात्र ही मुलगी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याची विश्वसनीय माहिती आळेफाटा पोलीस व ग्रामविकास अधिकारी आणे यांना मिळाली होती.
दरम्यान, आळेफाटा पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या बेल्हा दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार नारायण बरडे, आनंद गावकर व आणे येथील ग्रामविकास अधिकारी एस. एस. जंजाळ हे दुपारी दोनच्या सुमारास विवाहाच्या ठिकाणी आले.
त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी हा होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला व संबंधीत मुलीच्या पालकांना त्याबाबत समज दिली.
आळंदीतून मुलीचे अपहरण
आळंदी : येथील घुंडरे आळी परिसरातून अज्ञाताने कोणत्या तरी अज्ञात कारणाने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले असल्याची माहिती आळंदी पोलीस नाईक राजेंद्र कोणकिरी यांनी दिली. विकास सूर्यभान मालक (रा. घुंडरे आळी, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार : मंगळवारी (दि. ३) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुम्ाांरास फिर्यादी यांच्या १७ वर्षांच्या मुलीस अज्ञाताने पळवून नेले आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. एल. शिंदे तपास करीत आहेत.