Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:02 PM2018-09-03T15:02:59+5:302018-09-03T15:08:48+5:30
पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते.
पुणे : दहीहांडी चा उत्साह शहरभर दिसून येत अाहे. सगळीकडे अानंद, चैतन्य भरवणारा असा हा सण. एकावर एक थर लावून उंचावरील दहीहांडी फाेडताना मंडळांमधील उत्साह शिगेला पाेहचलेला असताे. पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी थर लावत दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. कात्रज येथील शारदा वसतीगृहातील दृष्टीहिन युवकांनी व एकलव्य बाल शिक्षण न्यास संस्थेतील मुलांनी दहिहंडी फोडली. यावेळी न्यू गंधर्व बॅन्ड यांनी वादन केले. तसेच गोपाळकाला म्हणून संस्थेतील मुलांना महिनाभराचा शिधा मदत स्वरूपात देण्यात आला. संस्थेतर्फे एकलव्य बाल शिक्षण न्यास संस्थेच्या इंद्रायणी गावस्कर यांना माता यशोदा सन्मानाने गौरविण्यात आले.
यावेळी समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेल्या मुलांना आनंद देण्यासाठी व त्यांना यशस्वीपणे उभे करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आज मला माता यशोदा सन्मानाने गौरविण्यात आले याचे सर्व श्रेय हे माझ्या आई रेणू गावस्कर व संस्थेतील मुलांचेच आहे. मी त्यांना जेवढा आनंद दिला त्यापेक्षा दुप्पट आनंद मला त्यांच्याकडून मिळाला आहे. त्यामुळे अशा उपेक्षित मुलांसाठी यशोदा मातेप्रमाणे काम करणे हे माझे उद्दिष्ट आहे, असे मत एकलव्य बाल शिक्षण न्यास संस्थेच्या इंद्रायणी गावस्कर यांनी व्यक्त केले.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, विशेष मुलांना समाज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांनाही सण-उत्सवाचा आनंद घेता यावा, या करीता प्रबोधिनीतर्फे दरवर्षी आपली दहीहंडी चे आयोजन करण्यात येते. तसेच उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या महिलांना प्रबोधिनी तर्फे यशोदा माता सन्माने गौरविण्यात येते. सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या सन्मानाचे आयोजन करण्यात येते.