.. अन् पाडवा गोड झाला.., गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा कलावंतांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 AM2021-04-14T04:10:30+5:302021-04-14T04:10:30+5:30
कल्पना नसतानाही अचानक मदतीचा हात पुढे आल्याने कलावंतांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. कांबरे ( ता. भोर ) येथील कांबरेकर ...
कल्पना नसतानाही अचानक मदतीचा हात पुढे आल्याने कलावंतांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.
कांबरे ( ता. भोर ) येथील कांबरेकर तमाशा फडातील कलावंत असणाऱ्या पंधरा कलावंतांच्या कुटुंबांना नसरापूर मंडलाधिकारी श्रीनिवास कंद्देपल्ली यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप देण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे तलाठी जे. डी. बरकडे, भोर तालुका पत्रकार संघाचे पत्रकार बंधू, कांबरेकर तमाशा फडाचे मालक रंदीप कांबरेकर, नाना कांबरेकर, रघुनाथ कांबरेकर, भगवान कांबरेकर, दादा शेलार आदी तमाशा कलावंत यावेळी उपस्थित होते. तदनंतर आर्थिक विवंचनेमुळे कामाच्या शोधात असणारे केळवडे व नसरापूर या फडातील कलावंतांना किटचे वाटप करण्यात आले.
मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली म्हणाले की, अशा तमाशा कलावंतांना खऱ्या अर्थाने मदत होणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन कंडेपल्ली यांनी केले आहे. तमाशा कलावंत त्यांच्या कलेने श्रीमंत असले तरी आर्थिक बाजूने कमकुवत आहेत. त्यातच कोरोनाचे संकट त्यांच्या पुढे आ वासून उभे आहे. साऱ्या कलावंतांना कुठेच आपल्या कलेची प्रदर्शन न करता आल्याने त्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांच्या रोजच्या नित्याच्या गरजाही भागू शकत नाहीत.
- गुढीपाडव्याच्या दिनी मिळालेली मदत ही आमच्यासाठी लाखमोलाची आहे. परंपरागत असणारा तमाशा कलेवर आमचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र गेल्या वर्षापासून कोरोनाने आमचे तमाशा बंद पडल्याने हलाखीची जीवन कलाकार जगत आहे. शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे.
नाना कांबरेकर, तमाशा कलावंत.
कांबरे ( ता. भोर ) येथील कांबरेकर तमाशा फडातील कलावंत असणाऱ्या पंधरा कलावंतांच्या कुटुंबांना नसरापूर मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली व तलाठी जे. डी. बरकडे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप देण्यात आले.