इंदापूर तालुक्यातील अंगणवाड्या अद्ययावत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:54+5:302021-02-17T04:16:54+5:30

भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील अंगणवाडीच्या बांधकामासाठी अनेक गावांतील नागरिकांनी नूतन इमारती गावांमध्ये व्हाव्यात, यासाठी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला ...

Anganwadas in Indapur taluka will be updated | इंदापूर तालुक्यातील अंगणवाड्या अद्ययावत करणार

इंदापूर तालुक्यातील अंगणवाड्या अद्ययावत करणार

googlenewsNext

भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील अंगणवाडीच्या बांधकामासाठी अनेक गावांतील नागरिकांनी नूतन इमारती गावांमध्ये व्हाव्यात, यासाठी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. २३ गावांतील नागरिकांची आग्रहाने या संदर्भात मागणी असल्यामुळे, नवीन अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने या गावातील अंगणवाड्या जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये भरत होत्या, तर काही अंगणवाड्या, खाजगी जागेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भरत होत्या. त्यामुळे या गावांना नवीन इमारतीची नितांत गरज होती, आता प्रत्येक अंगणवाडी इमारतीसाठी ८. ५० लक्ष निधी मंजूर केला असल्यामुळे, तालुक्यातील पडस्थळ, वरकुटे बुद्रुक, गलांडवाडी नंबर १, कालठण नंबर १, वरकुटे खुर्द दगडेवस्ती, तरडगाव, गलांडवाडी नंबर २, वडापुरी, शेळगाव खोरोची गावठाण, शिरसाटवाडी गावातील डांगे वस्ती, लुमेवाडी, पिठेवाडी गावठाण, निरनिमगाव व मदनवाडी गावातील बंडगरवस्ती, डिकसळ, तसेच मदनवाडी गावातील वीरवस्ती, देवकाते वस्ती, कुरवली, कळस भरणेवाडी, अंथुर्णे गावातील बोराटे वस्ती, कळंब या २३ अंगणवाड्यांसाठी निधी मंजूर केला आहे.

संबंधित गावातील ग्रामपंचायतीने व नागरिकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन, जो निधी अंगणवाडी शाळा बांधकामासाठी मिळणार आहे. यासाठी दर्जेदार बांधकाम करून घ्यावे. अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया समजला जातो, हा पाया मजबूत होण्यासाठी या इमारती उपयुक्त ठरणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही ग्रामीण भागातील शिक्षण चळवळ अतिशय मजबूत झाली पाहिजे. या उद्देशाने तालुक्यातील अंगणवाडी जी बालके शिकताहेत, त्यांना योग्य शिक्षण चांगली दर्जेदार इमारती होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपली स्वतःची जबाबदारी म्हणून, दर्जेदार इमारती उभ्या राहण्यासाठी लक्ष द्यावे. असे आवाहन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

Web Title: Anganwadas in Indapur taluka will be updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.