अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट

By admin | Published: June 29, 2015 06:23 AM2015-06-29T06:23:05+5:302015-06-29T06:23:05+5:30

शिरसटवाडी नजिकच्या पागळेवस्ती येथील अंगणवाडीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामात ग्रामपंचायतीने मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.

Anganwadi Construction | अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट

अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट

Next

अंथुर्णे : शिरसटवाडी नजिकच्या पागळेवस्ती येथील अंगणवाडीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामात ग्रामपंचायतीने मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी करावी, अशी मागणी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष जयकुमार रावण यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन पाठविले आहे़
या बाबतच्या दिलेल्या निवेदनात रावण यांनी संबंधित ग्रामपंचायतीवर आरोप केले आहेत. अंगणवाडी शाळेचे बांधकाम ग्रामपंचायत शिरसटवाडी यांचे माध्यमातून ठेकेदाराची नेमणूक करून सुरू करण्यात आले होते. परंतु, हे बांधकाम गेल्या चार महिन्यापासून काही कारणास्तव बंद पडले आहे. केलेल्या बांधकामावर मोठ्या प्रमाणावर गाजर गवत उगवलेले आहे़ अर्धवट स्थितीत असणाऱ्या या बांधकामासाठी वीट, वाळु, सिमेंट, स्टील, सळई हे सर्व साहित्य निकृष्ठ दर्जाचे असल्याची त्यांची तक्रार आहे. या कामाचे मूल्यांकनानुसार पैसे दिल्याचे संबंधित अधिकाऱ्याने तोंडी सांगितले आहे. दिलेली रक्कम कामापेक्षा जादा आहे. सर्वानी मिळुन शासनाच्या या अतिक्षय चांगल्या योजनेचा बोजवारा उडविला आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.

४शिरसटवाडी येथे युवकांसाठी मंजूर असलेल्या व्यायाम शाळेचे काम काही लोकांनी त्या ठिकाणची जागा स्व:मालकीची असल्याचे कारण दाखवून बंद पाडले. हे काम सुरू करताना ग्रामपंचायतीने ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची गावठानातील असल्याचे सांगितले होते़ हे अर्धवट अवस्थेतील काम गावठान व गायरान मोजून पूर्ण करण्यासाठी आवश्यक होते. काम पूर्ण न झाल्यास शासनाचा आलेला निधी परत जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Anganwadi Construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.