Pune News| कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या पाल्ल्यांना मिळाले 50 लाखांचे सानुग्रह सहाय्य निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 02:00 PM2022-01-27T14:00:52+5:302022-01-27T14:08:42+5:30
सदर प्रस्तावास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली
पुणे : फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणा-या सरकारी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचा-यांच्या नातेवाईकांना तब्बल 50 लाख रुपये सानुग्रह सहाय्य निधी दिले जाते. पुणे शहरातील पर्वती दर्शन विभागाच्या अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. या सेविकेच्या पाल्ल्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळावे यासाठी प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता आनंदा ओव्हाळ मुख्यसेविका कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला यांनी पाठपुरावा केला. अखेर एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त यांनी हा अर्ज मंजूर करत अंगणवाडी सेविकेच्या पाल्ल्यांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली.
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील पर्वती दर्शन विभागाच्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांचा अंगणवाडी केंद्राशी संबंधित सेवा बजावताना कोविड १९ चा संसर्ग झालेल्या लाभार्थ्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना संसर्ग होऊन१४ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाला. त्या पार्वश्वभूमीवर प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता आनंदा ओव्हाळ मुख्यसेविक कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला यांनी पाठपुरावा करीत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना (महाराष्ट्र राज्य) नवी मुंबई यांच्याकडे दिवंगत अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांच्या पाल्ल्यांना सानुग्रह सहाय्य निधी मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला होता.
सदर प्रस्तावास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली. हे सानुग्रह सहाय्य निधी २६ जानेवारी २०२२ रोजी अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांच्या कन्या अंकिता व मुलगा आकाश शिळीमकर यांना वितरित करण्यात आला. सानुग्रह सहाय्य निधी ५० लाख रुपये वितरण आयुक्त राहुल मोरे आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त बी.एल.मुंढे, दिलीप हिरवाळे, सुहिता आनंदा ओव्हाळ, मनिषा बिरारीस, कल्पना व्यंकटेश चिरमुल्ला, गट समन्वयक प्रविणसिंग पदमसिंग राजपूत, मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला उपस्थित होते.