अंगणवाड्या होणार ‘हायटेक’; महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:49 AM2017-11-03T11:49:48+5:302017-11-03T11:54:04+5:30

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे आता रूप पालटणार आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Anganwadis to be 'hi-tech'; Women and Child Welfare Department funded Rs. 1.7 crore | अंगणवाड्या होणार ‘हायटेक’; महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी

अंगणवाड्या होणार ‘हायटेक’; महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी

Next
ठळक मुद्दे१ कोटी ७० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी केंद्रांना सुविधा पुरविण्यासाठीफॅन, धान्यकोठी, वॉटर फिल्टर, लॅपटॉप, दृकश्राव्य, शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी निधी मंजूर

पुणे : महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे या निधीमधून जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे आता रूप पालटणार आहे. या निधीतून अंगणवाड्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने सांगितले.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़  त्यामध्ये पुरेशा सुविधाही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे़  जिल्ह्यात खासगी शाळांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले असल्यामुळे पालकांचा मुलांना खासगी शाळेत घालण्याकडे ओढा आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला मिळालेल्या निधीपैकी १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी केंद्रांना सुविधा पुरविण्यासाठी दिला आहे़ 
या निधीतून अंगणवाडी केंद्रांना फॅन, धान्यकोठी, वॉटर फिल्टर, लॅपटॉप, दृकश्राव्य, शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य पुरविण्यासाठी हा निधी मंजूर केला आहे़  यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना गरजेनुसार साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, चांगल्या दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण चिमुरड्यांना मिळणार आहे़
गेल्या दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये लोकवर्गणीतून विविध उपक्रम राबविले. तसेच, विविध वस्तूही खरेदी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यामुळे अनेक अंगणवाड्यांचा दर्जा सुधारला आहे़ आता मात्र जिल्हा परिषदेच्या निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने खºया अर्थाने अंगणवाड्या ‘हायटेक’ होणार आहेत़

 

अंगणवाडीमध्ये अन्नधान्याची स्वच्छता राहावी़  विद्यार्थ्यांना चांगले पाणी प्यायला मिळावे; तसेच लॅपटॉपमुळे आॅनलाइन रेकॉर्ड ठेवण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे़      
- दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
 

Web Title: Anganwadis to be 'hi-tech'; Women and Child Welfare Department funded Rs. 1.7 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.