संर्पक तुटलेल्या गावातील लोकांसाठी सहयाद्री रेस्क्यु टिमचे सदस्य ठरले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:31+5:302021-07-27T04:12:31+5:30

भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर महाड राष्ट्रीय महामार्गावर २२ ठिकाणी दरडी पडल्याने मागील पाच दिवस रस्ता बंद ...

Angels became members of the Sahyadri rescue team for the people of the village who lost contact | संर्पक तुटलेल्या गावातील लोकांसाठी सहयाद्री रेस्क्यु टिमचे सदस्य ठरले देवदूत

संर्पक तुटलेल्या गावातील लोकांसाठी सहयाद्री रेस्क्यु टिमचे सदस्य ठरले देवदूत

Next

भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर महाड राष्ट्रीय महामार्गावर २२ ठिकाणी दरडी पडल्याने मागील पाच दिवस रस्ता बंद आहे. यामुळे सदर मार्गावरील पाच गावांचा संर्पक तुटलेला आहे. त्यामुळे या गावातील लोकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. येथील कोरोनाग्रस्तांना व इतर रुग्णांना औषधांचे किट दिले., शिवाय नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल चार्ज करणारे पॉवर बँक दिले.

या गावांपर्यत सध्या वाहन जाऊ शकत नाही त्यामुळे चिखलमातीतून वाट काढत शिरगाव पासून उबार्डे गावापर्यत ९ किलो मीटर चालत आणी पुन्हा परत ९ किलोमीटर माघारी असा १८ किलो मीटरचा प्रवास सहयाद्री रेस्क्यु फोर्स भोर या टिमचे सदस्य सचिन देशमुख व निलेश आवाळे यांनी लोकां पर्यत पोहचवले यामुळे गावातील लोकांना वेळेत औषधोपचार मिळणार असून वीज नसलेल्या गावात संर्पक होणार आहे यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आरोग्य विभागाने दिलेले औषध गोळयाचे किट आणी संर्पक होण्यासाठी तहसिदार अजित पाटील यांनी पावर बॅंक दिले होते. शिरगाव, उंबार्डे व अशिपी गावात पॉवर बँक लोकांना देण्याचे ठरवले आरोग्य विभागाकडून औषधांचे किट घेतले पावर बँक दिल्या होत्या त्या घेऊन भोर महाड रस्त्याने रस्त्यावरुन पायी प्रवास करून औषधे व साहित्य शिरगाव, उंबार्डेवाडी, अशिंपी, उंबार्डे या गावात पोचवली गेली.

--

चौकट

---

भोर तालुक्याच्या २२ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे भोर महाड या राष्ट्रीय महामार्गावर २२ ठिकाणी तर निराघर धरणाच्या रिंगरोडवर ८ ठिकाणी आणी भोर पांगारी धारमंडप रस्त्यावर पाच ठिकाणी डोंगरातील दगड माती पाण्याबरोबर वाहून येऊन मोठमोठया दरडी पडल्याने तीनही मार्गावरील वाहातुक बंद झाले त्यामुळे येथील सुमारे १४ गावांचा संर्पक तुटला. गावात कोणत्याही सुविधा लोकांना मिळत नाहीत. नागरीक शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत होते. दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे प्रशासनालाही मदत करणे अवघड झाले होते. कोरोनामुळे आजारी लोकांना औषधे पुरवता येत नव्हती, यामुळे नागरीक प्रशासनावर नाराज होती.

Web Title: Angels became members of the Sahyadri rescue team for the people of the village who lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.