‘ब्रेकअप’चा राग, मुलीचा अश्लील व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला बेड्या; पुणे पोलिसांची गोव्यात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 11:14 AM2024-01-31T11:14:06+5:302024-01-31T11:15:17+5:30

आरोपीने मुलीला अश्लील व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. त्याने तो कॉल रेकॉर्ड केला...

Anger of 'breakup', shackles to the one who posted the obscene video of the girl; Action of Pune Police in Goa | ‘ब्रेकअप’चा राग, मुलीचा अश्लील व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला बेड्या; पुणे पोलिसांची गोव्यात कारवाई

‘ब्रेकअप’चा राग, मुलीचा अश्लील व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला बेड्या; पुणे पोलिसांची गोव्यात कारवाई

पुणे : मुलीचा अश्लील व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी गोव्यातून अटक केली. पीडित मुलीने फिर्याद दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनय मारुती शेकापुरे (वय २३, रा. गणेश कृपा मिरामार पणजी गोवा, मूळ रा. मु.पो मुखेड जि .नांदेड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने मुलीला अश्लील व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. त्याने तो कॉल रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांचे ब्रेक अप झाल्याचा राग मनात धरून व्हिडीओ फेक इन्स्ट्राग्राम आयडी बनवून तसेच यूट्यूबवर लिंक बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने पीडित मुलीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्ह्याचा तपास करीत असताना पीडित मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे, व्हिडीओ कुणी प्रसारित केला याबाबत काही माहिती नसताना केवळ तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे आरोपी हा गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीस असल्याबाबत माहिती काढली. सहकारनगर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सोपान नावडकर, पोलिस अंमलदार अमोल पवार, नीलेश शिवतरे, सागर सुतकर आणि निखिल राजीवडे या पथकाने गोव्यातील विविध हॉटेलमध्ये शोध घेतला.

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कामास असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला सापळा रचून तो कामावरून घरी जात असताना ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गोव्यातून त्याला सहकारनगर पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे करीत आहेत.

Web Title: Anger of 'breakup', shackles to the one who posted the obscene video of the girl; Action of Pune Police in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.