ब्रेकअपचा राग, सोशल मीडियावर तरुणीची बदनामी; अश्लील मेसेज, फोटो केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:52 IST2023-07-03T11:48:03+5:302023-07-03T11:52:31+5:30
आरोपीविरोधात चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

ब्रेकअपचा राग, सोशल मीडियावर तरुणीची बदनामी; अश्लील मेसेज, फोटो केले व्हायरल
पुणे : ब्रेकअप केल्याचा राग मनात धरून तरुणीची सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना औंध परिसरात घडली आहे. याप्रकरणी प्रभात प्रकाश पंडित यांच्याविरोधात चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंध परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रभात पंडित आणि फिर्यादी यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनतर काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झाल्याने त्याचा राग मनात धरून पंडित याने महिलेची बदनामी करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून महिलेच्या ऑफिसमधील लोकांना आणि नातेवाईकांना अश्लील मेसेज पाठवले. त्यांनतर महिलेच्या भावाला सुद्धा मेसेज पाठवून तरुणीची बदनामी केली. तसेच गावात जाऊन तमाशा करेल अशी धमकी दिली.
याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान ३५४, ५००, ५०४, ५०६ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील हे करत आहेत.