किरकोळ वादाचा राग; सोसायटीच्या सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार

By भाग्यश्री गिलडा | Published: June 9, 2024 07:22 PM2024-06-09T19:22:28+5:302024-06-09T19:22:46+5:30

दरम्यानच्या काळात तक्रारदारांचे मोठे भाऊ राकेश अग्रवाल यांना या मानसिक त्रासामुळे हृदयविकाराचा झटका

anger over a minor dispute The secretary of the society took the support of black magic | किरकोळ वादाचा राग; सोसायटीच्या सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार

किरकोळ वादाचा राग; सोसायटीच्या सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार

पुणे : किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी सोसायटीचा सेक्रेटरी व त्याच्या मुलाने सोसायटीमध्ये राहणार्या एका कुटूंबावर तंत्रमंत्राच्या सहाय्याने काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सोसायटीचा सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी (रा. पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा) यांच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, रुपेश अग्रवाल (वय- ४६, रा. कोंढवा) यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. तक्रारदार रुपेश अग्रवाल आणि सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी हे तिघेही पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा या सोसायटीमध्ये राहतात. तक्रारदार रुपेश अग्रवाल व त्यांचे वडील राजेंद्र अग्रवाल १४ मार्च २०२४ रोजी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाले होते. त्यावेळी सोसायटीचे गेट उघडण्यासाठी वॉचमन हजार नव्हता. फिर्यादींनी सेक्रेटरी राजकुमार जोशी यांना वॉचमन गेटवर का नाही? असे विचारांचे असता वॉचमन माझी गाडी धुण्यासाठी दुसर्या सोसायटीमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले. यावर सेक्रेटरी राजकुमार जोशी यांना ’वॉचमनला तुम्ही वैयक्तिक कामासाठी का पाठवता’? असे विचारल्याचा राग मनात धरून अंकुर जोशी याने तक्रारदार व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून तुम्हा दोघांना बघुन घेतो अशी धमकी दिली. तसेच त्यांच्या विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. तसेच तक्रारदार व त्याच्या कुटूंबीयांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने अंकुर जोशी याने काळी जादू करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी गेटवर लिंबु ठेवुन व स्वस्तिक वर काळी बाहुली जाळुन जादुटोणा करून अग्रवाल यांच्या कुटुंबियांच्या मनात भिती निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केलेले आहे. दरम्यानच्या काळात तक्रारदारांचे मोठे भाऊ राकेश अग्रवाल यांना या मानसिक त्रासामुळे हृदयविकाराचा झटका देखील आला आहे. या पार्श्वभूमीवर सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: anger over a minor dispute The secretary of the society took the support of black magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.