महाविकास आघाडी सरकारवरील संताप पंढरपूरमध्ये व्यक्त झाला : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:37+5:302021-05-03T04:07:37+5:30

पुणे : राज्यातील जनता शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागली असून, या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत ...

Anger over Mahavikas Aghadi government expressed in Pandharpur: Chandrakant Patil | महाविकास आघाडी सरकारवरील संताप पंढरपूरमध्ये व्यक्त झाला : चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारवरील संताप पंढरपूरमध्ये व्यक्त झाला : चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे : राज्यातील जनता शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागली असून, या सरकारबद्दलचा संताप पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला आहे़, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पाटील म्हणाले, विजेची कनेक्शन कापणे, वेगवेगळी नुकसानभरपाई खात्यात जमा न करणे, शेतकºयांना मदत नाही, पीकविम्याचा लाभ नाही, कोविडच्या काळात हातावर पोट असणाºयांना पॅकेज नाही, अशा अनेक प्रश्नांनी लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली असून, ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट झाली आहे़ लोकांच्या मनात आघाडी सरकारबद्दल राग आहे. संधी मिळेल तेथे लोक तो व्यक्त करतात. ग्रामपंचायत निवडणुकीतही साडेचौदा हजार पैकी सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपाला विजय मिळाला. महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत, हे या पोटनिवडणुकीतील जनतेच्या कौलावरून दिसून आले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय हा पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा विजय आहे. आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी एकदिलाने भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना साथ दिल्याने हा विजय सोपा झाला़ पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन त्यांना जबाबदारी दिल्याप्रमाणे कामगिरी केली. संघटित शक्तीतून हा विजय मिळाला असून, पंढरपूरच्या विजयाने बरेच काही शिकायला मिळाले असल्याचेही पाटील यांनी सांगितले़

---------------

Web Title: Anger over Mahavikas Aghadi government expressed in Pandharpur: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.