संतप्त प्रवाशांची रेल्वेवर दगडफेक

By admin | Published: September 23, 2015 03:37 AM2015-09-23T03:37:14+5:302015-09-23T03:37:14+5:30

केडगावला थांबणारी हैदराबाद -मुंबई एक्सप्रेस आणि बारामती -पुणे -कर्जत शटल या दोन्ही सकाळच्या गाड्या उशिराने धावत असल्याने अन्य एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा

Angry passengers pelted stones on the railway | संतप्त प्रवाशांची रेल्वेवर दगडफेक

संतप्त प्रवाशांची रेल्वेवर दगडफेक

Next

केडगाव : केडगावला थांबणारी हैदराबाद -मुंबई एक्सप्रेस आणि बारामती -पुणे -कर्जत शटल या दोन्ही सकाळच्या गाड्या उशिराने धावत असल्याने अन्य एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा, या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले़ त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुवर्ण जंयती एक्सप्रेसवर दगडफेक केली़ ही घटना मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली़
एक्सप्रेस रेल्वेगाड्या रेल्वेस्थानकावर काही मिनिटांसाठी तरी थांबवाव्या ही प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आज या मागणीचा उद्रेक झाला.
सकाळी हैदराबादवरून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस सुमारे ४ तास उशिरा होती. त्यामुळे दुसऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना २ मिनिटांचा थांबा द्यावा, अशी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे विनंती केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत अधिकाऱ्यांनी आझाद हिंद एक्स्प्रेसला थांबा दिला नाही.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी धुडकावून लावली व सिग्नल दिल्याने रेल्वे केडगाव स्थानकावरून सुसाट निघून गेली. त्यानंतर १५ मिनिटांनी स्थानकातून ‘सुवर्णजयंती एक्स्प्रेस’ जात असल्याचे प्रवाशांना समजले. त्यानंतर प्रवासी पुन्हा रेल्वेस्थानकातील अधिकाऱ्यांपाशी जमा झाले. या एक्स्प्रेसला तरी २ मिनिटांचा थांबा द्यावा, अशी मागणी पुन्हा त्यांनी केली.
महिला प्रवासी व रेल्वेस्थानकातील कर्मचारी, अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतरही एक्स्प्रेस रेल्वेला थांबा न देण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम होते. ही एक्स्प्रेस गाडी जाण्यासाठी ही प्रशासनाने हिरवा सिग्नल दिला. त्यानंतर मात्र, प्रवाशी संतप्त झाले.
सुमारे २00 प्रवासी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरले. रेल्वे रुळाच्या मधोमध उभे राहिले. २ जणांनी रेल्वे थांबावी म्हणून रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे ट्रॅकवर लाल फडके काठीच्या साहाय्याने उभे केले. तरीही रेल्वेच्या ड्रायव्हरने एक्स्पे्रस हळू केली, पण सिग्नल न मिळाल्याने थांबण्याच्या मन:स्थितीत तो नव्हता. त्यानंतर २ संतप्त अनोळखी प्रवाशांनी दगड इंजिनच्या दिशेने भिरकावले. यामध्ये इंजिनसमोरील काच फुटल्याचे समजले. त्यानंतर रेल्वे रुळावर थांबली. संतप्त प्रवासी अवघ्या काही सेकंदांत रेल्वेत बसून पुण्याकडे रवाना झाले. दगडफेकीवेळी मात्र रेल्वे प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली.
दररोज पुण्याकडे जाणाऱ्या सोलापूर व मनमाड पॅसेंजर उशिरा येतात. त्यामुळे पुण्याकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशाचा आज उद्रेक झाला. (वार्ताहर)

Web Title: Angry passengers pelted stones on the railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.