कांदळीच्या उपसरपंचपदी अनिल भोर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:38+5:302021-09-26T04:11:38+5:30
कांदळीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच विक्रम भोर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अनिल भोर आणि गोरक्षनाथ गुंजाळ यांनी उमेदवारी ...
कांदळीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच विक्रम भोर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अनिल भोर आणि गोरक्षनाथ गुंजाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एकूण १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत एक सदस्य आजारपणामुळे उपस्थित राहू न शकल्याने १२ सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. यामध्ये अनिल भोर यांना १० मते, तर गणपत गुंजाळ यांना २ मते पडली. अनिल भोर यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा कांदळीचे ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. मुळूक यांनी सांगितले. निवडणूक सुरळीत होण्यासाठी कांदळीचे तलाठी अमर खसाळे, उत्तम गुंजाळ, अनिल घोडेकर यांचे सहकार्य लाभले.
कांदळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्यावर अनिल भोर यांचे सरपंच विक्रम भोर यांनी सर्व ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन केले. यावेळी माजी उपसरपंच सुदर्शन बढे, ग्रामपंचायत सदस्य मनोज फुलसुंदर, गोरक्षनाथ गुंजाळ, सचिन रोकडे, आशा भालेराव, लक्ष्मी बढे, जया शिंदे, अक्षदा भोर, वृषाली बढे, छाया गोपाळे, सुनंदा गुंजाळ तसेच कांदळीचे माजी सरपंच बाळासोा बढे, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन अशोक बढे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण गुंजाळ, पोलीसपाटील अरुण भालेराव, हनुमंत भोर, बन्सी गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, सुनील गुंजाळ, नारायण भोर, तानाजी बढे, सुरेश बढे, महेश बढे, दयानंद बढे, शांताराम बढे, शिवशंकर मांडे, अजित घाडगे, के. को. रोकडे, आशिष शिंदे, हरिभाऊ भोर, दिगंबर भोर, अनंता भोर, आजाबा भोर, यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
२५ वडगाव कांदळी
निवडीनंतर अनिल भोर यांचा सत्कार करताना मान्यवर.