क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी अनिल फरांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:23+5:302021-04-01T04:11:23+5:30
पुणे : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई)च्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक व फरांदे प्रमोटर्स ...
पुणे : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई)च्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक व फरांदे प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल फरांदे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्याकडून फरांदे यांनी बुधवारी (दि.३१) सूत्रे स्वीकारली. एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीसाठी फरांदे हे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील, असे ‘क्रेडाई पुणे’च्या वतीने कळविण्यात आले.
रणजीत नाईक, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून अरविंद जैन (सचिव), आय. पी. इनामदार (खजिनदार) तर तेजराज पाटील हे मानद सहसचिव म्हणून पुढील दोन वर्षांसाठी काम पाहतील. याशिवाय अन्य १६ सभासद या कार्यकाळात व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहतील. पुणे क्रेडाई मेट्रो ही पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम विकासकांची १९८२ साली स्थापन झालेली संस्था आहे. संस्थेचे चौदाशे सभासद आहेत.