सखींसाठी ‘अनिल स्वरमोहिनी’

By admin | Published: July 9, 2015 02:58 AM2015-07-09T02:58:55+5:302015-07-09T02:58:55+5:30

‘अनिल स्वरमोहिनी’ हा अनिलजींच्या संगीत संयोजनात रंगलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम शनिवारी रंगणार आहे.

'Anil Swaroophuhiini' for the Sakshi | सखींसाठी ‘अनिल स्वरमोहिनी’

सखींसाठी ‘अनिल स्वरमोहिनी’

Next

पुणे : अनिल मोहिले यांची सुरेल सांगीतिक आठवण म्हणून सुरेल संस्थेतर्फे ‘अनिल स्वरमोहिनी’ हा अनिलजींच्या संगीत संयोजनात रंगलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम शनिवार, दि. ११ जुलै २०१५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळात टिळक स्मारक मंदिर येथे होत आहे.
स्वरयोगी संगीतकार अनिल मोहिले (अनिल-अरुण) यांची दि. ८ जुलै २०१५ तृतीय पुण्यतिथी. हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि भावसंगीतावर अधिराज्य गाजवून १९६0 ते २0१२चा काळ गाजला तो अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनामुळे.
शनिवारी होत असलेल्या कार्यक्रमात मोगरा फुलला, दिल चीज क्या है, स्वप्नातल्या कळ्यांनो, तेरे मेरे मिलन की येरैना, मेघा छाए आधी रात, शुक्रतारा मंदवारा, या चिमण्यांनो परत फिरा रे, परीकथेतील राजकुमारा, तरूण आहे. रात्र अजुनी अशी एकाहून एक सरस गाणी सादर होणार आहेत.
अनिल मोहिले यांच्या अनेक स्टेज शोमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या त्यांच्या शिष्या देविका दामले व मोहिका दामले ही गीते सादर करणार आहेत. सहगायक म्हणून अवधूत गांधी, तसेच तबल्यावर डॉ. राजेंद्र दूरकर, हार्मोनियमनवर नरेंद्र चिपळूणकर, ऱ्हिदमसाठी अविनाश कुलकर्णी, बासरीवर नीेलेश देशपांडे व सिंथेसायझरवर यश भंडारे यांची साथसंगत असेल.
या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, निवेदन, डॉ. गौरी दामले यांचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Anil Swaroophuhiini' for the Sakshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.