मांढरदेवीच्या यात्रेत पशुपक्षी हत्या आणि दारूबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 02:01 PM2019-12-19T14:01:59+5:302019-12-19T14:11:01+5:30

राज्यभरातून भाविक येतात प्रसिद्ध मांढरदेवी यात्रेला

Animal slaughter and drunkenness closed during the journey of MandharDevi | मांढरदेवीच्या यात्रेत पशुपक्षी हत्या आणि दारूबंदी

मांढरदेवीच्या यात्रेत पशुपक्षी हत्या आणि दारूबंदी

googlenewsNext
ठळक मुद्देमांढरदेवीच्या यात्रेबाबत प्रशासनाकडून सुविधांबाबत आढावा : ९, १0, ११ जानेवारीला यात्रानियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार

भोर :  राज्यात प्रसिद्ध असलेल्या मांढरदेवीच्या यात्रेनिमित्त प्रशासनाकडून खराब रस्त्यांची दुरुस्ती, बाहेरील अतिक्रमणे काढणे, पोलीस तपासणी पथक, आरोग्याची सुविधा, एसटी बसची सेवा, पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह या सुविधांबाबत आढावा घेण्यात आला आणि कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. तर यात्राकाळात पशुपक्षी हत्या व दारूबंदी करण्यात आली असून त्यासाठी तपासणी पथके नेमण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. ९, १०, ११ जानेवारीला मांढरदेवच्या काळुबाईची यात्रा असून त्यानिमित्त तहसीलदार अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची बैठक घेऊन वरील सूचना केल्या. यावेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरीक्षक राजू मोरे, तालुका  अधिकारी डॉ. सूर्यकांत काराळे, सहायक अभियंता वीज वितरण मंडळ संतोष चव्हाण, पशुधनविकास अधिकारी पी. बी रेवतीकर, शाखा अभियंता वाय. ओ. मेटेकर, आगारप्रमुख एस. आर. हिवाळे संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक व पोलीसपाटील उपस्थित होते.   सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरचे खड्डे भरले असून घाटातील दरडी, गवत काढून रस्ता रुंद करणे रंगरंगोटी व रिफ्लेक्टर नामफलक लावण्यात आले आहेत. रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालय ते चौपाटी शिवाजी पुतळा येथील अतिक्रमणे काढण्यात येणार असून, संपूर्ण रस्त्यावरील झाडांच्या फांद्या काढून रस्ता वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वाय. ओ. मेटेकर यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून आंबाडखिंड घाटाखाली एक आरोग्य पथक दिवसरात्र ठेवण्यात येणार असून, त्यात एक वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक आरोग्य सहायक, फार्मासिस्ट, शिपाई नेमणूक करण्यात आली असून, ३ रुग्णवाहिका एक फिरते पथक उपजिल्हा रुग्णालयात १२ खाटांचा एक वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे, महामार्गावरील शिंदेवाडी ते कापूरव्होळ व भोर आंबाडे गावापर्यंतच्या विहिरींचे पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत काराळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे जादा गाड्यांची सोय करण्यात आली असून, वायरलेस यंत्रणा दोन टँकर घाटात व मध्यभागी एक पथक रुग्णवाहिका, स्पीकरची सोय करण्यात येणार आहे.
........
पोलीस करणार ठिकठिकाणी तपासणी 
 
पोलीस विभागाकडून वाहतूक सुरळीत राहावी, म्हणून भोर पोलीस राजगड पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांचे पथक नेमण्यात येणार आहे. भोर एसटी स्टँड, रामबाग, चौपाटी भोर आंबाडखिंड आयटीआयसमोर पार्किंगजवळ पोलीस तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काळजी भोर पोलिसांना घ्यावी लागणार आहे. शहरासह सर्व बाहेरील अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात यावीत. याचा त्रास भाविकांना होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना तहसीलदार अजित पाटील यांनी दिल्या.
...........
...तर त्यांच्यावर कडक कारवाई : पाटील
मांढरदेवी आणि कांजळे यात्राकाळात पशुपक्षी हत्याबंदी आणि दारूबंदी करण्यात आली असून त्याची भरारी पथकाच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणत्याही भविकांनी पशुपक्षी आणल्यास पोलीस तपासणी पथक जप्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.   
....................
तपासणी पथकाच्या माध्यमातून वाहनांची व चालकाची तपासणी करून मद्यप्राशन केलेले नाही, याची खात्री केली जाणार असून नंतरच वाहने सोडली जाणार आहेत, तर गाड्या भरल्या की मांढरदेवला पाठवल्या जातात. त्यासाठी स्पीकरवर जाहीर केले 
जाणार आहे.
घाटात क्रेनची सोय करणार असल्याचे आगारप्रमुख एस. आर. हिवाळे यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीकडून यात्राकाळात विजेची व्यवस्था करणे, भारनियमन होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

Web Title: Animal slaughter and drunkenness closed during the journey of MandharDevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.