उर्दू भाषेचे व कुराणचे गाढे अभ्यासक अनिस चिश्ती यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:20 PM2021-04-05T21:20:36+5:302021-04-05T21:20:47+5:30
बेड उपलब्ध नसल्यामुळे वेळेत होऊ शकले नाही उपचार....
पुणे : उर्दू भाषा आणि कुराणचे गाढे अभ्यासक अनिस अहमद चिश्ती यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर पुण्यात निधन झाले आहे.
अनिस चिश्ती यांचा जन्म पुण्यातच झाला होता तसेच त्यांनी सर्व शिक्षण ही येथेच पूर्ण केले.चिश्ती यांना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर शहरातील दोन तीन हॉस्पीटलमध्ये त्यांना नेण्यात आले. मात्र तिथे बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ वेळेवर उपचार होऊ शकले नाही.
त्यांच्या मागे १ मुलगी आणि नातवंडे आहेत. पत्नीचे २०१६ मध्ये निधन झाले.उर्दू आणि कुराणचे गाढा अभ्यास होता. कुराण इंग्रजीमध्ये शिकवण्यासाठी ते अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स, इजिप्तसह अनेक देशांचा अनेकवेळा दौरा केला.